पान:राष्ट्रसंत तुकडोजी महाराज - जनजागरण कार्य.pdf/10

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

योग साधनेत, अध्यात्मसाधनेत वेचले आहे. राष्ट्रसेवा कार्याला या अधिष्ठानाची गरज असते, हे त्यांनी सर्वांना पटवून दिले. कर्मकांडावर त्यांचा फारसा विश्वास नव्हता म्हणून तुकडोजी महाराजांनी माझ्या चितेच्या भोवती फक्त शांती पाठ म्हणावा. मंदिर बांधू नका, असे त्यांनी स्वत:च सांगितले होते. “मला जर जनता जनार्दनाच्या सेवेत पुनर्जन्म लाभला तर लोकांच्याच सान्निध्यात मी तो घालवीन' असे उदात्त विचार. संत तुकडोजींचे होते. यावरून त्यांच्या या विचारांची, व्यक्तिमत्वाची झेप कशी उत्तुंग होती, याची प्रचीती येते.. या राष्ट्रीय चिंतनाचे अधिष्ठान त्यांच्या संतत्वाला होते. राष्ट्रीय संत जीवनाचा एक सर्वांग सुंदर आविष्कार संत तुकडोजींच्या व्यक्तिमत्वात पाहावयास मिळतो. त्यांच्या विचारातील समाजकारण आणि अध्यात्मजीवन यांचा हा मनोज्ञ मेळ आहे. संत तुकडोजींची ग्रामगीता : 'गावा गावासी जागवा। भेदभाव हा समूळ मिटवा। उजळवा ग्रामोन्नतीचा हा दिवा। तुकडया म्हणे।।' अद्यापही खेडेगावात लिहिणे वाचणे कमी म्हणून त्यांनी खेडूतांना पचेल, रुजेल तेच सोप्या भाषेत आळवले आणि म्हणून संत तुकडोजी महाराजांची प्रसिद्ध ग्रामगीता घराघरात पोहचली. जर अद्यापही पोहचली नसेल तर ती पोहचवावी