नसत. दारू विषयीं शिवाजी महाराजांची सर्व राज्यांत सक्त मनाई असे. पाश्चिमात्याकडून अलीकडे विद्येचे पूर हिंदुस्थानांत वाहत आल्याबाबद पुष्कळ विद्वान लोक मोठमोठाल्या संभांतून त्यांची स्तुति करितात ते खुशाल करोत. परंतु विद्येचे पुरा मागें मद्याचे पूर त्यांनीं आणून या भरत भूमींत सोडले आहेत. त्यांत आमचे नवीन विद्वान् पुष्कळ बुडून मरत आहेत. या त्यांच्या दुष्ट वर्तनाविषयीं त्यांची कोणी निंदा करीत नाहीं! ही मोठी दुःखाची गोष्ट आहे.
शिवाजी महाराजांचे वेळेस मावळे व हेटकरी लोकांचा पोषाख झटला ह्मणजे डोकीस रुमाल किंवा वेडें वांकडें पागोटें असे. मावळे लोक बहुत करून पागोटें घालीत. आणि हेटकरी लोक रुमाल बांधीत. नेसण्यास गुडघ्या पर्यंत धोतर, पायांत वहाणा अंगांत बंडी, कंबरेस धोतर व त्याचे वर दारूनें भरलेलें तें चामड्याचें तोस्तान असे. खांद्यावर घोंगडी व तिजवरच टाकलेली तोड्याची बंदूक किंवा बगलेंत लटकती तलवार असा पोषाख असे. रात्रीं निजण्यास हंतरूण ह्मटलें ह्मणजे तें कंबरेचें धोतर व पांघरण्यास ती घोंगडी, असली ह्मणजे झाला आमच्या शूर शिपायाचा बिच्छाना, या सुखशय्येवर सर्वकाळ सोबतीस निजणारी त्याची मैत्रीण ती बंदूक अथवा तलवार होय. तिचे सोबतीनें हे शूर