Jump to content

पान:रायगड किल्याचें वर्णन.pdf/६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ५७ )

'शिपाई रानांत वनांत पाहिजे तेथें सुखानें निद्रा घेत असत. ज्या प्रमाणें ही जिवाची मैत्रीण सर्वकाळ त्याचे जिवाचें रक्षण करीत असे. त्या प्रमाणें दुसरी वर सांगितलेली मैत्रिण त्याचे बरोबर असे ती त्याचे जिवाचे रक्षण करी ती कोणती विचाराल कर त्याची ती घोंगडी होय. ती पर्जन्यकाळीं पावसा पासून त्याचे रक्षण करी. इतकेंच नव्हे तर थंडीचे दिवसांत पुन्हा त्याचे अंगांत उबारा आणण्यास ही तीच उपयोगीं पडत असे, या प्रमाणें साधे स्थितींत छत्रपती शिवाजी महाराजांचे शिपाई रहात असत. याजमुळें पाहिजे त्या ठिकाणीं पाहिजे त्या वेळीं धन्याची आज्ञा झाली असतां त्यांची जाण्याची अगदीं एके पायावर तयारी असे. या अशा अगदीं साधारण स्थितींतील शिपायांनीं देखील निवळ आपले शौर्याचे बळानें आणि पुन्हा कितीएक प्रसंगी तर काळोख्या रात्रीं सुद्धा मोठमोठाल्या डोंगराच्या दरडी चढून पुरंदरा सारखे, सिंव्हगडा सारखे, प्रतापगडा सारखे,मजबूत किछे सरकरून आमचे हवाली केले! तेव्हां धन्य ते शिपाई होत. या एकंदर वर्णनावरून आपल्यास असें दिसतें कीं मनुष्याची किंमत कांहीं बाहेरच्या पोषाखावर किंवा डामडौलावर नाहीं तर त्याची खरी किंमत अंतर्यामचे गुणावर असते. कितीएक पुरुष आपण बाहेरून पाहिलें तर राजासारखे मोठे उमराव राजासारखे शोभायमान दिसतात. परंतु त्यांचीं मनें पाहिलीं तर अनीतीनें भरलेलीं, आत्मस्वार्थी भित्रीं अशीं असतात. परंतु कितीएक पुरुष बाहेरून पाहिलें तर अगदीं साधे