Jump to content

पान:रायगड किल्याचें वर्णन.pdf/५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ५५ )

आपणास भूषण मानति; ते कधीं आपल्या धन्या जवळ खोटें बोलत नसत. व असें करणें मोठें पाप आहे, अशी त्यांची समजूत होती. शिवाजी महाराज आज येथें तर उद्यां कोठें असतील याचा अदमास शत्रूस करिता येत नसे. याचें कारणही हेंच होय. मराठ्यांचा दरारा मोंगल लोकांस इतका असे कीं, जर त्यांचा घोडा पाणी पीत नसेल तर थट्टेनें त्यास ते विचारीत कीं, "तुला मराठा पाण्यांत दिसतो कीं काय? " याचप्रमाणें बंगाल्याकडे लहान मुलांस ( जसें आपण आपल्या मुलांस बाउ आला बाउ आला, असें सांगतो. तसें ) "मराठा आला, मराठा आला, " असें मुलगें रडत असेल तर सांगण्याचा प्रघात अजून आहे. अशी आमची जिकडे तिकडे कीर्ति व दरारा होता. ती आतां आमच्यांतून कोठें गेली हें मात्र कळत नाहीं,



अन्न.

 शिवाजी महाराजांचे वेळेस साधारण मराठ्यांचें दररोजचें जेवण ह्मटलें ह्मणजे खिचडी, व त्यांत शेवटीं शिजतांना तूप घालीत असत; हें अन्न, आणि तोंडी लावण्यास मिर्च्यांची चटणी असली ह्मणजे त्यांचा निर्वाह होत असे. (गुजराथेंत व माळव्यांत मराठ्यांस थट्टेनें “चटणी खाऊ" असें ह्मणण्याचा प्रघात आहे. तो यावरूनच पडला असावा असें वाटतें. ) मांसाचा उपयोग ते फार थोडे वेळीं ह्मणजे सणावारीं मात्र करीत असत. ते दारू पीत