॥ सद्भावानें विरचिन तिथें मीं तुला पर्णपद्म ॥ १५ ॥
॥ जाई जाई तरी मग अतां जायवेगें कृपाळा ॥
॥ भेटे प्रेमें कडकडुनियां आप्तवर्गा नृपाळा ॥
॥ पाहूनीया स्वजन तुजला फार होतील तुष्ट ॥
॥ आनंदानें करतिल तुझें आदरें ते अभिष्ठ ॥ १६ ।।
समाधिशतावली.
ज्या वेळीं महाराज समाधिस्त झाले ते समयीं त्यांचे खजिन्यांत द्रव्य होतें, त्याचा तपशील येणें प्रमाणें. खुद्द महाराजांचे शिक्कयाचे रोख रुपये नऊ कोट होते. सोनें एकावन हजारतोळे होतें. माणकें व पाच वगैरे दोनशें तोळे होतें मोत्यें पांचशें तोळे, व हिरे दोनशें तोळे होते.
मोहिमीवर जातांना तोफा वगैरे बरोबर नेण्याचा प्रघात नसे. मुख्य करामत वेळोवेळीं काम करण्यांत व चपळपणांत असे. मावळे लोकांत हा मोठा गुण असे कीं, ते धन्याची आज्ञा ती देवाची आज्ञा मानीत असत आणि ती अमलांत आणण्यांत जिवाकडे सुद्धां ते अगदीं पहात नसत. असे प्रकारें वागणें हें एक प्रकारचें ते