कारभारी यांची घरें याचे दरम्यान परराज्याकडील लोक उतरण्याकरितां ह्मणून घर बांधलें होतें , तेथें ही मंडळी जाऊन उतरली. यावेळीं राज्याभिषेक होण्याची घणघोर तयारी चालली होती. यामुळें या विलायती मंडळीची भेटहोण्याचा योग कांहीं केल्या येईना. नारायणजीचे यत्नानें शेवटीं एकदिवस निश्चित् ठरून तशी यांस वर्दी मिळाली. ( हरकतीचे कागद महाराजांकडे आधींच नारायणजीमार्फत पाठवून दिले होते. ) या वकिलांनी महाराजांकडे जी यादी पाठवून दिली होती, त्यापैकी दोन कलमें अमान्य करून बाकी सर्व कलमें कबूल केलीं. महाराजांनीं जी कलमें नाकबूल केली तेवढी मात्र येथें सांगतों :-
कंपनीचें ह्मणणे होतें कीं, "आमचें नाणें महाराजांचे राज्यांत चालावें.” याविषयीं महाराज असें ह्मणाले कीं " जर कंपनीचें नाणें चोख असेल तर मग माझे राज्यांतील रयत सहज त्याच्याशीं व्यवहार करील, याजबाबद कलम यादीत घालण्यास नको." दुसरें कलम असें होतें कीं, “कंपनीचे गलबतांतील माल वाहत वाहत महाराजांचे राज्यांतील बंदरांत आला असतां, किंवा कंपनीचें गलबत महाराजांचे राज्याचे हद्दींत फुटले असतां, तें परत कंपनीस मिळावें. " या दुसरे कलमा बाबद महाराजांनीं असे सांगितले कीं, " वहात आलेला माल व गलबत परत देणें हें कोंकणचे रिवाजास अनुसरून नाहीं. इतकें असूनही जर ही व्यवस्था
पान:रायगड किल्याचें वर्णन.pdf/२५
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २१ )