आह्मी इंगलिश व्यापाऱ्यांकरितां केली, तर आह्मापाशीं डच व फ्रेंच लोकही तसेंच मागणें करतील! या करितां अशी नवी रीत सुरू करतां येत नाहीं." बाकीच्या कलमां बाबद विचार करून यादी तयार करण्याचें काम आबाजी सोनदेव व युवराज संभाजी महाराज यांजवर महाराजांनीं पूर्वी सोंपवून दिलें होतें त्या प्रमाणें काम तयार करून हे दोघेही सभेस हजर झाले.
तारिख ६ जून सन १६७४ रोजीं दरबार भरला. कंपनीचे वकील पोषाख करून नजर नजराणा कसा काय करावयाचा, याची रीतभात समजून घेऊन तेथें आले. महाराज भव्य सिंव्हासनावर बसले होते. भालदार, चोपदार, यांचे हातांत सोनेरी, रुपेरी, राजदंड असून त्यांच्या ललकाऱ्या चालल्या होत्या. सिंव्हासनाजवळच खालीं युवराज संभाजी महाराज बसले होते. पलिकडे मोरोत्रिंबक पेशवे, व हंसाजी हंबीरराव सेनापती वगैरे मंडळी बसली होती. सिंव्हासनाचे उजवे बाजूस सोनेरी माशांची डोकीं, त्यांचे मोठमोठाले दांतासुद्धां टांगलेलीं होतीं. डावे हातास मोराचे पिसांचे झुबके टांगले होते. सिंव्हासनाच्या पायऱ्यांवर सोनेरी पत्रे जडले होते. अशा प्रकारच्या या दरबारांत मिस्तर हेनरी आकज्नन साहेब पायांतील बूट बाहेर काढून आले. आणि प्रथम दुरून मोठ्या अदबीनें महाराजांस मुजरा केला. नारायणजीचे सहाय्यानें हिऱ्याची आंगठी व विलायती मौल्यवान वस्त वगैरे महाराजांचे सिंव्हासनापुढे ठेविल्या. महारा
पान:रायगड किल्याचें वर्णन.pdf/२६
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २२ )