पान:रामायणे भाग पहिला.pdf/९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९० मोरोपंतकृत राम म्हणे, 'वि'ज याभिध मुहूर्त आहे बरा प्लवंगपते ! । आज निघावें, जय मज घडतो, मरतील दुष्ट कोणैप ते ॥ २१ जे गंज गव य गवाक्ष प्लवंग चालोत ते पुढें सबल; । उत्तरदक्षिणपार्श्वी ऋषभ, दुजा गंधमादन प्रबल ॥ कपिराया ! तूं जं घनीं राहुनियां सावधान संरक्षी; । २२ २३ पाळूत वेगदर्शी सुपेणसह जांबुवंत हे कॅक्षीं ॥ कपिकुलना य क नील खवलें रक्ष समस्तसेनेला; । सावध वर्ता, अतिबल रिपु, तो अंतासि पाहिजे नेला ॥ २४ मी वायुकुमारा च्या स्कंधीं बैसोनि चालतों कटकीं; । वालिसुतस्कंधी तूं अनुजा ! चढ, जेंवि अद्रिच्या केटकीं. २५ अल्पपराक्र म दुर्बल जर असतील प्लवंग, तर त्यांतें । किष्किधानगरीं तूं स्थापुनि, घे शत्रुसिंधुतरत्यांतें.' ॥ वचन असें श्री रघुकुलतिलकाचें ऐकतांचि, यूथवर । जयशब्द करिति, तो ध्वनि जाता झाला, दिगंत जेथवर ॥२७ बंदुनि रघु रा यातें, उठती धरुनी करीं शिला विटपी; । शतबलि, शरभ, दरीमुख, पनस, गजार्क, प्रजंघ, दंभ, कपी. २८ गरुडस्कंध में धुरिपु, जेंवि मैयूरद्विजावरि स्कंद, । तैसे अधिष्ठिती ते दाशरथी वायुजांगदस्कंध || बहुकोटि ध्वज तैसे, कपि करिती पुच्छसंघ ते वरते; । तेव्हां गमती जाणों जाती यमदंड राक्षसांवर ते ॥ गोरे, नीळे तो य दवृंद तसे, रक्त किति कपी, बाळे, । पिंवळे, प्रवालसंनिभ, किति धूमाक्ष, प्लवंग किति काळे ॥ ३१ ते ' चलितध रा धरसे पीनें, प्लवगप्रवीर, बहुसंख्य । गर्जति घनसे, म्हणती, 'शीघ्र घडो रावणासवें संख्य.' ।। ३२ पैरिघप्रति म भुजांतें, ताडिति हसती कपी किती उडती; । धावति कांपविति क्षिति, पाडिति तरु पर्वतावरी चढती ॥ ३३ १. विजयनामक २ हे सुग्रीवा ३. राक्षस. ४. गजादिनामक वानर ५. उत्तरदक्षिणभागीं. ६. सेनामध्यभागीं. ७ मध्यभागी ८. हे लक्ष्मणा. ९. कड्यावर. १०. शत्रुसमुद्रतरणा-यांतें. ११. समूहपति, १२. वृक्ष. १३. विष्णु. १४. मयूरपक्ष्यावर १५ कार्तिकस्वामी १६. मारुति व अंगद, यांचा खांदा. १७. मेवसमहसे. १८. पोंवळ्यासारखे. १९. चालणाऱ्या पर्वतासारखे. २०. पुष्ट. २१. युद्ध. २२. स्तंभतुल्य बाहूतें. २९ ३०