पान:रामायणे भाग पहिला.pdf/९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

1 युद्धकांड] मंत्र रामायण. याहुनि पुढे य मालयतुल्या लंका, सुवर्णप्राकारा; । गंभीरनीरपरिखा, गुप्तद्वारा, सुरांगनाकारा ॥ पूर्वद्वारी विजयी रक्षक शस्त्रास्त्रवित बली अयुत; । ८९ तितुकेच असुर पश्चिमदिग्द्वारीं वसति शौर्यशक्तियुत ॥ १० असिशूलसा य कासनशरकर संख्येकरूनियां नियुँत; । यमयक्षपदिग्द्वारें रक्षिति निद्रेकरूनि जे विद्युत ॥ ११ पैदातकुंज रा श्वस्यंदनपूर्णा, प्रदोषचरसेना; । वीर्योदीर्णा, यमसमवर्णा, स्थल जीस तेथे गवसेना ॥ १२ दुर्गम दुर्ग म हादृढतर परमक्रूर परि 'पैरीतमती । मज ते तवप्रतापज्वलनाची स्वैर्णवेदिका गमती. ॥ १३ त्रिपुर जसें श्री कंटें स्वशरें केलें क्षणांत भस्म रणीं; । तशि तव दासें लंका जाळुनि केली क्षमा पुरस्मरणी. ॥ १४ प्रभु ! तव परा क्रमाग्निस तृणसंहति इंद्र जिजनकलंका; । वधिशिल रणांगणी त्या दशानना सर्वसज्जनकलंका.' ॥ १५ ऐसें ऐकुनि मग तो राम म्हणे, 'मारुते ! महाबाहो ! । रावण मारिन ऐसा आहे तो सत्य कौम हा बा ! हो. ॥१६ कशि ते धनं ज यमुखीं वीरा ! त्वां होमिली स्वयें लंका ? । जैनकर्णामृतधारा राहो तव कीर्ति नित्य अकलंका || १७ हा मकराल य दुस्तर, याहुनिही जानकी वियोग मैतें; । गमतें संकट सारें; तुमचीं कैशीं अहो ! प्लवंग ! मतें ?? ॥ १८ वौनरकुल राज म्हणे, 'सिद्धि असे धैर्यबेलनयोत्सा हें; । साहें वियोगदुःख, क्षैयिष्णु आहे जगन्निवासा ! हें. ॥ १९ तव सेवक मर्यादा विलंघनीं मात्र हो न हे सकती; । प्लवग, तैवांघ्रिप्लवगत, तरले भवसिंधु, हा समुद्र किती ? २० १. सुवर्णाचा कोट जिला अशी. २. खोल पाणी आहे ज्यांत असे खंदक जीस. ३. रक्षित- द्वारा. ४. देवांगनाची बंदिशाळा. ५. दहाहजार ६. खड्ग शूलधनुर्बाणहस्त ७. लक्ष. ८. दक्षिण आणि उत्तर दिशा यांची द्वारें. ९. हीन. १०. पायदळ हत्ती घोडे रथ यांही पूर्ण. ११. राक्षस- सेना १२ लंकेंत १३ बुद्धिहीन. १४. सुवर्णकुंड. १५. पृथ्वी १६. नगरांचें स्मरण जीच्या ठायीं अशी, किंवा त्रिपुराचें स्मरण जीच्या ठायीं अशी. १७. तृणसमूह. १८. रावणाची लंका. १९. इच्छा. २०. अग्निमुखीं. २१. लोकांच्या कानास अमृतधारारूप. २२. मातें. २३. सुमीव, २४. धैर्य, बल, नीति, व उत्साह यांहींकरून, २५, नवर. २६. त्वत्पदनौकाश्रित १२