पान:रामायणे भाग पहिला.pdf/९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मोरीपंतकृत स्वहितक रा ला बंधन केले द्वैतागुणासमान गुणे; । यमपाशबद्ध हो तूं; वाढो सैत्पात्रदान भूरिगुणें ॥ सेवीं पर म सुखावह रामाचे पाद दाससुरतरुचे; । १२९ परदाररता ! तुजला निज कांतेशींच कां न सुरत रुचे? ॥१३० आयुः कीर्तिश्री क्षय कां करिशी? निजगुणेंचि विपरीतें; । इच्छिशि चिंता निजाया, मूढा ! कंटाळलासि उँपरीतें.' ॥१३१ हें ऐकुनि रा में तो सांगे दासांसि देवरिपु राजा; । 'कपि मारा, भाजा, खा, किंवा हा द्या सुळावरि, पुरा जा.' ॥१३२ हें ऐकतां महात्मा बिभीषण प्राज्ञ तो म्हणे, 'राया ! । दूत अवध्य; नयज्ञा ! योग्य नसे हा प्लवंग माराया.' ॥ १३३ मौनी अनु ज वचन; मग माँनी दशकंठ तो म्हणे, 'धांवा; । घृततैलसिक्तवस्त्रें मर्कटपुच्छाग्रभाग बांधावा. ॥ लावा अग्नि य थेष्ट, प्रहार दंडादिकें करा, करवा; । १३४ १३५ लंकापुरींत मारा, मार करित हा घरोघरीं फिरवा.' ॥ आज्ञा होतां, रा क्षस पेटविती आंजनेयलांगूल; । वेष्टिति जसे पिपीलैक, खैदिरांगारासि मानुनी गूळ ॥ १३६ हें ऐकोनि में हीजा, दाँसस्वस्त्यर्थ, 'वन्हिला विनवी; । चित्तीं म्हणे, 'मला कां चिता प्रतिकूल दैव लावि नवी? ॥ १३७ नंदैन नि ज मित्राचा, सीतेचा भक्त, देवकार्यकर; । पुच्छाग्रकेशशिखरीं, म्हणुनि वसे वन्हि जेंवि शीतकर ॥ १३८ पुच्छाग्रालय पावक, मैणिदीप तसा, करी न तापातें; । असुरांपासुनि 'हैरि तो उडता झाला, न हालतां पतें ॥ १३९ पैरिघें, भुज दंडानें, निर्मुनि नेक्तंचरप्रमथनातें; । अनले प्रदीप्त लंका केली, जैशीं पुरे प्रेमथनायें ॥ १४० १. कोळीकीटाच्या सुतासारख्या दोरानें. २. उत्तमपात्री दान. ३. अनंतगुणे. ४. भक्त- कल्पद्रुमाचे. ५. क्रीडा. ६. प्रेतशय्या. ७. माडीतें. ८. रावण ९. मान्य करी. १०. अभि- मानी. ११. मारुतीचें पुच्छ. १२. मुंग्या १३. खैराच्या इंगळाला. १४. सीता. १५. मारुतिकल्या- णार्थ. १६. अग्नीला. १७. पुत्र. १८. अग्निमित्र (वायु) याचा. १९. चंद्र. २० पुच्छामीं राहणारा. २१. रखदीप २२. वानर. २३. नेत्रांचें पातें २४. स्तंभे २५. राक्षसनाशातें. २६. अग्नीनें. २७. त्रिपुरें. २८. शिवें.