पान:रामायणे भाग पहिला.pdf/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१. मात्रारामायण. पवनसुताचा आधीं, मग पुरवी भानुसूनुचा काम. ॥ घनदुरभिमान जो, त्या शकसुता वाळिला वधी; राज्य । सुग्रीवास कैपींचें देउनि, जगदीश दे सुख प्राज्य. ॥ चर सर्वत्र प्रेमी श्री शोधाया सुकंठ, परि शोध | अंग्रज जटायुचा कथि; लंधी जलधीस वातसुत योध. ॥ छळुनि सुरसेसि, मारी छायाग्रह सिंहिका, 'पुरी पाहे । त्या श्रीस अशोकवनीं देखूनि, उगाचि पैदिपी राहे. ॥ जड दशमुख ये रात्रीं, 'मैन्महिषी हो,' म्हणे गतंत्रीड । धिक्कारी प्रभुभार्या त्यासि; तयाची न ती धरी भीड. ॥ झडपी मारुति न तया, आज्ञा प्रभुची नसे म्हणोनीच. । ३ २० स्त्रमनांत म्हणे, 'म्हणतो हें आयु:शेष तो, म्हणो नीच.' ॥ २१ ट्पकरि मार्गे घेउनि गेली स्त्री त्या दशानना क्षुद्रा. 1 मग एकांतीं प्रभुची स्तुति करुनि, श्रीस नमुनि, दे मुद्रा ॥ २२ ठकवी, सेंबळा अक्षा वधुनि, रणीं घनरवा महामाया । । ब्रह्मास्त्रा सांपडला; काळमुखींही न योग्य हा माँया. ॥ डसुनि भुजंग कर्धी तरि गरुडाला ह्मणवितील 'हो !' काय ? पेटवितां पुच्छ, उडे, जाळी लंकापुरी, महाकाय ॥ ढळवुनि पैरंभृतिनग ये; प्रभुला वंदुनि, 'विलोकिली देवी,' । ऐसें सांगुनि, चूडामणिसह, मस्तक पदीं पुन्हा ठेवी ॥ ण पुढे मागें रा ज्या, तो रॉय कपीस भेटला, वानी; । मानी बहु सिंधुतटा गेला, घेऊनि कीश सेनानी ॥ तत विभीषण झाला सौग्रजदोषाग्निनें, शरण आला; । २३ २४ २५ २६ १. मारुतीचा, २. सुग्रीवाचा, ३. इच्छा. ४. दृढ असा दुष्ट अभिमान आहे ज्याला ५० वा नरांचें. ६. पुष्कळ. ७. दूत. ८. धाडी. ९. सीता. १०. सुप्रीव ११. ज्येष्ठबंधु. (संपाती.) १२. मारुति १३. योद्धा. १४. राक्षसीविशेष (ही नागमाता देवांनी मारुतीची परीक्षा पहाण्याकरितां पाठविली होती.) १५. आकाशमार्गाने जाणान्यांची छाया ग्रहण करणारी. (सिंहिकेचें विशेषण.) १६. राक्षसीविशेष. (राहूची माता.) १७. लंका. १८. वृक्ष. १९. माझी पट्टराणी. २०. गेली आहे लज्जा ज्याची, निर्लज्ज २१. त्वरित २२. नीचा. २३. आंगठी. २४. सैन्यसहिता, २५. राक्षसवि- शेष. (रावण पुत्र.) २६. इंद्रजितास. २७. सामावयास. २८. खेदार्थी. २९. शत्रूचा धैर्यरूप पर्वत, . ३०. शिरोरत्नासह ३१. रावण ३२, वानर. ३३. सेनापति ३४. रावणाच्या दोषरूप अग्नीनें,