पान:रामायणे भाग पहिला.pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२ मोरोपंतकृत उग्रा भार्गवरामा प्रभु, दावुनि बाहुबळ, करी शांत । •पितृसत्यरक्षणें, शुचि यश जोडाया, निघे रमाकांत ॥ ऊर्ध्वगति तथा राजा, सुतशोकें देह सांडितां, घडली. । राज्यश्री भरताच्या मैनुवर्षे प्रभुमतें गळां पडली. ॥ ऋषि सर्व भरद्वाजप्रमुख प्रभु हर्षवी, पदें नमुनी; । सानुज, सदार, हर्षे बहु वर्षे तापसाश्रमीं क्रमुनी ॥ एक दिवससा सरला बहु काळ तपोधनाश्रमी हर्पे. । पितृसख जटायु भिजवी पृ॑थुशीप प्रेमजाश्रुच्या वर्षे ॥ ऐश्वर्यातें कुंतुकें झांकुनि, गोदावरीतटीं राहे.। दशमुख 'भगिनीघ्राणच्छेदन, खैरसैन्यनाशही, साहे. ॥ ओस पडाया स्वकुळ स्वर्णहरिण दाखवी, मन भ्रमवी; । 'श्री 'हॅरि, जटायुपक्ष च्छेदी, दशकंठ तापसां श्रमवी. ॥ औषध भत्ररोगाचें ज्याचें यश, तो पुसे खगमृगातें, । 'कोठें प्राणसखी ?' हे लीला तारावया करि जगातें ॥ 'अंकी जटायुचें घे शिर, रावणकर्म कथुनि, तो गेला. । दे त्या पिंडोदक, परि तच्छोकें दीनबंधु कोमेला ॥ अस्त्रे शस्त्रे प्राथिति, परि धैर्य धरी, चरित्र वाढाया । प्रभु जाय पुढें, सुरमुनिगत देशवक्रशल्य काढाया ॥ कवळी केंबंध राक्षस भक्षाया जो, तयाहि दे सुगती । ऐसें नसोनि, गर्ने आपणची प्रभु म्हणोनि, कां फुगती ? ॥ खंगपास विरोधाला, तेविं कबंधाहि, उद्धरी; मग ती । भक्ता शंबरी प्रेमें प्रभुला पूजुनि वरील कां न गती ? ॥ गहिवरला पंपेच्या तीरीं, श्रीतें स्मरोनियां, राम । ७ ८ ९ १२ १३ १. परशुरामास. २. स्वर्गवास. ३. दशरथाला. ४. मनु म्ह० चवदा वर्षे. ५. लक्ष्मणासह. ६. सीतेसह. ७. ऋ, ऌ, लू, ह्या वर्णाचे शब्द नसल्यामुळे ह्या वर्णोच्या आर्या नाहीत. तसेच पुढे ङ, ञ, आणि ळ यांच्याही नाहींत. ८. बाप दशरथ याचा मित्र. ९. पुम्रयत् जो राम त्याचें मस्तक, १०. आनंदाश्रूंच्या. ११. कौतुकें. १२. रावणाची बहीण जी शूर्पणखा तिच्या नासिकेचें छेदन. १३. राक्षसविशेष. १४. लक्ष्मी म्ह० सीता. १५. हरण करी. १६. मांडीवर १७. म्लान झाला, १८. रावणरूप कांटा. १९. राक्षसविशेष. (यास मस्तक नव्हते). २०. जटायूस. २१. राक्षस- विशेष २२. या नांवाची स्त्री.