पान:रामायणे भाग पहिला.pdf/७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मोरोपंतकृत रामायणें. १. मात्रारामायण. (गीतिवृत्त.) अजित प्रभु विधिवचनें, त्रिजगत्पीडक दशास्य माराया । होय चतुर्मूर्तिधर श्रीदशरथपुत्र, भक्त ताराया ॥ आदिपुरुष देव घरी, जीं तातें संविधि ठेविलीं, नामें; । तीं राम भरत लक्ष्मण शत्रुघ्न अशीं सुखधिंचीं धामें ॥ ईष्टयर्थ गाँधिसुत ने, अस्त्रे शत दे, मैखन्नअरि खपवी. । पावे, स्वपराभवकर राक्षसनाशें, उदंड 'हॅरिख पंवी. ॥ ईश्वर 'मुँनिभायेंतें चरणरजें उद्धरी, करी धन्या. । ३ हेरधनु चुरि, जनकाच्या कौशिक चवघांसि देववी कन्या. ॥ ४ १ २ १. पंतांची ७३ मराठी रामायणें व १ संस्कृत रामायण मिळून ७४ रामायणें उपलब्ध आहेत. ७३ मराठी रामायणांपैकी ३८ मात्रागणवृत्तांत रचिलेली आहेत, ३३ अक्षरगणवृत्तांत आहेत, आणि २ प्राकृतवृत्तांत रचिलेली आहेत. मात्रागणवृत्ताच्या ३८ रामायणांपैकी ३१ गीतिवृत्ताचीं, १ आर्यावृत्ताचें २ साकीवृत्ताचीं, २ दोहावृत्ताचीं, १ सौम्यावृत्ताचें, व १ पज्झटिकावृत्ताचें आहे. अक्षरगणवृत्तांच्या ३३ रामायणांपैकी ३१ समवृत्तांत आहेत, व २ अर्धसमवृत्तांत आहेत. या ३१ समवृत्तांच्या रामायणांचा तपशील येणेप्रमाणे आहे:- ४ अष्टाक्षरी वृत्ताचीं, २ एकादशाक्षरी वृत्ताचीं, ६ द्वादशाक्षरी वृत्ताचीं, १ त्रयोदशाक्षरी वृत्ताचें, १ चतुर्दशाक्षरी वृत्ताचें, १ पंचदशा- क्षरी वृत्ताचें, २ षोडशाक्षरी वृत्ताची, ४ सप्तदशाक्षरी वृत्ताचीं, १ अष्टादशाक्षरी वृत्ताचें, २ एको- नविंशत्यक्षरी वृत्ताच, १ एकविंशत्यक्षरी वृत्ताचें, २ द्वाविंशत्यक्षरी वृत्ताची, १ त्रयोविंशत्यक्षरी वृत्ताचें, व ३ अनेक वृत्ताचीं, मिळून ३१. अर्धसमवृत्तांच्या दोन रामायणांपैकी एक पुष्पितामा वृत्तांत आहे व दुसरे वैतालीय अथवा वियोगिनी वृत्तांत आहे. प्राकृतवृत्तांच्या दोन रामायणांपैकी एक ओवीछंदांत आहे व दुसरें घनाक्षरीछंदांत आहे. पंतांनी एकंदर १०८ रामायणें रचिली अशी दंतकथा ऐकिवांत आहे, परंतु आजपर्यंत उपलब्ध झालेली वरील ७४ च आहेत. २. अपा- सून पर्यंत जे वर्ण आहेत त्यांस 'छंदःशास्त्रामध्यें मात्रा असें ह्मणतात. त्या मात्रा यांत अनु- क्रमानें आर्याचे आरंभी योजिल्या आहेत, ह्मणून यास 'मात्रारामायण' असें नांव दिले आहे. ३. जिंकण्यास अशक्य, ४. विष्णु. ५. ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून. ६. स्वर्ग, मृत्यु, पाताळ, यांस करणारा. ७. रावण ८. राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, चार देह धरणारा. ९. विधि- युक्त. १०. सुखवृद्धीचीं. ११. यज्ञरक्षणार्थ १२. विश्वामित्र १३. यज्ञविध्वंस करणारे शत्रु. १४. हर्ष, आनंद, १५. वज्र. १६. राम. १७. अहल्येते. १८. महादेवाचें धनुष्य १९ विश्वामित्र,