पान:रामायणे भाग पहिला.pdf/७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

किष्किंधाकांड] मंत्ररामायण. जातां ते ज ल कामी कुहरीं शिरले, तदा स्वयें अंचीं। त्यांतें सावर्णिसुता, स्वयंप्रभाख्या, तपोग्निची अर्ची ॥ ११२ आज्ञा हो य तिची, मग जाती कपि विंध्यपर्वतापाशीं; । ११३ सीतोपलब्धि नाहीं, यास्तव धरिती अखर्वतापासीं ॥ 'हा मास ज री गेला, तरि तो दंडील विभु; कसें करणें ? । धरणें' म्हणती 'अनशनसद्व्रत, येथेंचि सर्वथा मरणें ॥ भाग्योद य गृध्राचा जटायुचा थोर, जो स्वयेंच, रणीं । विक्रम करूनि झाला परलोकीं पूज्य निर्मलाचरणी ॥ रा घवाची सेवा कांहींच पुण्यदा न घडे;' । हें वदतां, विंध्यगुहागतसंपतिश्रुत शब्द पडे ॥ त्रिकल म ना संपाति स्वानुजमरणास ऐकता झाला; । आम्हास 'कालव्यालें केवळ, न कळत, गिळिलें' म्हणे 'मम भुजाला.'११७ मग तो श्री रघुपतिच्या दूतांसि म्हणे, 'निजाभिधान कथा; । वदतां 'मृतिवृत्तयुता, जटायुची शोकसंनिधानकथा.' ॥ ११८ गृधव रातें कथिती पूर्वकथा प्लवंग ते; तदा हा, तें । ऐकोनि, पावला बहु शोकाग्निकरूनि चित्तदाहातें ॥ ११९ 'हा वत्सा ! म रण तुला आलें; केलेंसि तुष्ट परलोका; । व्याकुल बहु मी झालों; टाकुनि गेलासि कां मला तोकाँ ?'१२० गृध्रद्वि ज अनुजातें करूनियांपांजलिप्रदान, मनीं । शोकाकुल होउनि, तो स्वदशा तेव्हां सुखप्रदा न मैंनी. ॥१२१ मग 'आ य का' म्हणे 'हो पूर्वकथा; एकदा स्वबलगवें । १२२ सूर्यरथाप्रति गेलों, तों केला दाह फार खेंगदेवें ॥ सूर्यकराच्या स्पर्शे गगनपथीं देहदाह बहु झाला; । तेव्हां, निजँपक्षाधःस्थापुनि, संरक्षिलेंचि अनुजाला ॥ अग्निस म बनकरें झाले अत्यंत विकल मत्प्राण; । जळले मत्पक्ष, परी केलें मीं बंधुचें परित्राण ॥ ७३ ११४ १२३ १२४ १. गुहेत. २. पूजी. ३. सावर्णिमनूची कन्या. ४. ज्वाला ५. महातापास. ६. निर्मल आहे आचरण ज्याचें असा. ७. विंध्यगुहेत स्थित जो जटायुबंधु संपाति त्याच्या कर्णी. ८. खिन्नांत:करण. ९. स्वनाम. १० मरणवर्तमानयुक्त. ११. संपातीतें. १२. वानर १३. मुला. १४. अपांजलि म्ह० उदकांजलि तिचें दान. (एथें 'अ' चा लोप व्याकरणशुद्ध नव्हे.) १५. मानी. १६. सूर्यै. १७. स्वपक्षाखाली १८. अग्नितुल्य सूर्यकिरणें. १०