पान:रामायणे भाग पहिला.pdf/६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अरण्यकांड] ५. मंत्ररामायण. तो तो 'य जाक्ष अंगमृगनगभृंगपतंगभुजगसंघातें । 'सीता विलोकिली कीं?" म्हणुनि पुसे मूँढ कामशरघातें ॥ ऐसें रानीं फिरतां, अधोमुखीनाम राक्षसी, नीचा, । लक्ष्मणशस्त्रें, पावे, स्वगुणें, गतिला देशास्यभगिनीच्या ॥ ते भ्रम तां क्रौंचवनीं, यथार्थनामा केबंध दोघांतें । कवळी योजनभुज तो, सिकतासेतू जसा जलौघांतें ॥ तेव्हां श्री कंठगलश्यामासियुगें धरूनियां, धीर । कंदलीकांड तसे ते प्रचंड भुजदंड खंडिती वीर ॥ मग राक्षस निजशाप, स्थूलशिरोविप्रदत्त, आयकवी; । सुग्रीववानरर्षभमैत्री करणें प्रियासि हे शिकवी. ॥ 'हामम देह करावा दग्ध' अशी प्रार्थना करी, विनवी; । आज्ञा घेउनि, गेला निजलोकातें, तनू धरून नवी ॥ कबंध ज्वलनीं होमुनियां, ते दयानिधी जाती; । तों शबरी करि भावें, मतंगविप्राश्रमांत, पूजा ती. ॥ भावें य शोनिधीतें पूजुनि, हर्षे तपस्विनी शबरी; । दनु ज सद्भक्तितुष्ट होउनि, अर्पी गति तीस जानकीश बरी. ॥ सत्काराच्या ग्रहणें, स्वदर्शनें, करुनियां विशुद्ध तिला; । आज्ञा घेऊनि पुसे, रघुनायक ऋष्यमूकपद्धतिला ॥ "अभि मतदानधुरीणा ! मजवरि केली अपार अनुकंपा; । शंपजितचापलता ! जाउनि आधीं विलोकिजे पंपा ॥ निज ज नकल्पतरो ! तूं, तेथुनियां, सर्वलोकनगरा जा; । मग पाहें सुग्रीवप्लवगाश्रय ऋष्यमूकनेंगराजा ॥ नित्य य राश्चंद्र तुझा दूर करू साधुविप्रतापातें; । वृद्धि असो कॅरिशुंडाजितदोर्दडद्वयप्रतापातें ॥ Au ८९ o ९२ ९३ ९४ o w ९७ ९८ १०० १. कमलनेत्र, (राम.) २. वृक्ष, हरिण, पर्वत, भ्रमर, पक्षी, सर्प, यांच्या समूहा. ३. मोहित. ४. शूर्पणखेच्या. ५. राक्षसविशेष. ६. वाळूचा बांध. ७. शिवकंठवत् काळ्या खड्गद्वयें. ८. केळीचे कर्वेडे. ९. स्थूलशिरा ब्राह्मणानें दिलेला. १०. राम. ११. ऋष्यमूक मार्गीला, इच्छित दानाविषयीं अग्रगण्या. १३. दया. १४. वितेस अजिंक्य धनुर्हता ज्याची अशा है। रामा. १५. भक्तकल्पद्रुम १६. सर्वलोकनामक नगरास. १७. पर्वतराज १८. हत्तीचे सोंडेस अजिंक्य जें भुजद्वय त्याचा जो प्रताप यास.