पान:रामायणे भाग पहिला.pdf/६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६२ मोरोपंतकृत श्व शुराला परलोकीं गेलिस जरि तूं करावया नमना; । पुसल्यावांचुनि कैशी सीते ! झालीस आज यानमना ? ॥ न्यावें म जही तेथें, श्वशुराची प्रार्थना करून, सती ! । भरत करू राज्यातें, तुजवांचुनि वींचुनी, सुखें नसती. ॥ राज्य श्री हरुनि, जरी कैकेयीनें वनास पाठविलं; । तरि तत्र योगें तें मीं नाहीं कांहीं मनांत आठविलें ॥ मज रा जकन्यके ! तूं वरूनियां पावलीस न सुखातें; । खातें हें चित्तातें; सांगों कोणास मी स्वदुःखातें ? ॥ हा कम लाक्षि ! तैनूदरि ! सुंदरि ! जाये ! प्रिये ! अये ! सदये ! । विधुमुखि ! पिकेगर्वापह, अमृताहुनि गोडसें, स्वयें वद; पंकज, विधु, हॅरि, गज, पिक, चमरीमृग, कीर जिंकिले होते;। त्वन्मित्रातें मातें, त्वद्वैरें, पीडितील सखि ! हो ! ते. ॥ हा प्रिय तमे ! वियोगज्वलनमुखीं होमिलेंस कां मातें ? । वैरी संतोषविले, टाकुनि यातें वनीं सकामातें.' ॥ ऐसा रा त्रिदिवसही विलाप करि शोकपर, जसा कोर्क; । कोकैनदाक्ष, सुमित्रातोकसहित, तो करी विकल लोक. ॥ शोधी में दिराक्षीला कांतारी, तो स्वतातमित्रातें । पाहे जटायुतें तो; मानी औँकाशनष्टमित्रातें ॥ मग जवळ जाय; पाहे; तो शस्त्रछिनपक्षती, पक्षी । आँसन्नमरण होउनि, राममुखातें स्वलोचनें लक्षी. ॥ 'माझ्याय शासवें ते सीता नेली दशाननें रामा ! ;' । ऐसें वदोनि, पावे अन्यजनालभ्यनित्यनिजधामा ॥ सानु ज राघव तेव्हां, 'हा तात !' असें रडोनियां त्यातें, । ८८ स्वपित्यातें दुर्लभ जें, तें दे जल, दाह करुनि, चुलत्यातें ॥ १ गमनी आहे मन जीचें अशी. २. जगून. ३. हे कृशोदरि. ४. हे चंद्रमुखि ५. को- किलांचा गर्व दूर करणारें. ६. चंद्र. ७. सिंह. ८. वनगाय ९. चक्रवाक पक्षी. १०. कमलनेत्र राम. ११. लक्ष्मणसहित १२. सीतेला १३ वनीं. १४. आकाशापासून पतित सूर्यच. १५. शस्त्र- च्छिन्न आहेत पंखांची मूळे ज्याची असा. १६. जवळ आले मरण ज्याला अमा, १७, अन्यांला न मिळणारें में अविनाशी निजपद त्यातें. ७७ ७८ ७९ ८० ८२ ८४ ८५ av ८७