पान:रामायणे भाग पहिला.pdf/७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६४ मोरोपंतकृत यानि ज पददासीचें स्मरण असों दे' म्हणोनियां, न तिला । शबरी करी, तदा प्रभु निघता झाला, स्वयें पुसोन तिला ॥ १०१ निर्द य कामशिलीमुखविद्धहृदय राम पावला कंपा; । १०२ १०३ १०४ . तैसाचि विविधशुकपिकबकशिखिकोकादिसंकुला पंपा. ॥ रघु रा ज तेथ जाउनि, पंपातीरीं करी निवेशातें, । तो स्मरमार्गणगणही रामहृदब्जी करी प्रवेशातें ॥ तेथें म यूर, सारस, हंस, कपिक्रौंचकीरकोकांतें; । सस्त्रीकांतें पाहुनि, मानी प्रभु धन्य पक्षिलोकांतें ॥ किष्किंधाकांड. पंपेची श्री पाहुनि, राम म्हणे लक्ष्मणास, 'कां मातें । सीता टाकुनि गेली स्नेहासह काननीं सकामातें ? ॥ या पुष्करा परीसहि, सीतेचें नेत्रयुग्म बहु रुचिर, । दैवें तिजशीं मजशीं योग न राहूं दिला सख्या ! सुचिर ॥ मातें क म लमृणालें विलोकितां स्मरति युवतिच्या सुभुजा; । प्रेणयक्रोधें मजला बद्ध करायासि सर्वथा विभु ज्या ॥ अलिपुंज देखतां, मज सीतेचे केश लक्ष्मणा ! स्मरती; । तत्कबरीसम हे शिखिपिच्छकलाप स्वमानसीं भरती ॥ मद्धृद य हंसपक्षी पीडिति गति भाषणेंकरून वनीं; । नवनीतकोमलांगी सीता दिसते मला मनोभवनीं ॥ वत्सा ! धेरा रुहातें वेष्टुनि, वल्ली जशाचि आहेत, । सीतालिंगित होतों ऐसा, परि तो न पूरला हेत. ॥ वत्सा ! विमल जसें हें पंपाजल यापरीस हृदय तिचें; । ६ यतिचें व्रत मज दिधलें तद्विरहें; 'क्रौर्य सुसह न नियं तिचें ॥ ७ पुष्पत्र ज हा मातें स्मैरमार्गणवृंदसाचि जाचितसे; । हा वायु विरैहै शिखिला दीप्त करुनि, मत्तनूसि पाँचितसे ॥ ८ १ २ ३ ४ ५ १. निर्दय जो काम त्याच्या बाणांनी फोडिलें हृदय ज्याचें असा. २. कामबाणसमूहही. ३. रामाच्या हृदयकमलीं. ४ कमलाहून. ५. प्रीतिकोपें. ६. समर्थ. ७ भ्रमरसमूह ८. सा सीतेच्या बेणीसारखे. ९. वृक्षातें १०. क्रूरपणा. ११. दैवाचें. १२. पुष्पसमूह १३. मदनवाणसमूहा- सारखाचि १४. वियोगाग्निला. १५. शिजवितसे.