पान:रामायणे भाग पहिला.pdf/६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अरण्यकांड] ५. मंत्ररामायण. नेतां मं हासतीतें पाहे दूरून ऋष्यमूक नग; । सुगलादि कपी देखे; सोडी कौशेयँबद्ध त्यांत नंग. ॥ आत्म श्री नाशास्तव, नेउनियां जानकीस लंकेला, । ठेवी अशोकवनिकागभ, न धरूनि पापशंकेला ॥ स्वश रा नें मारुनियां, तो राम वनांत ताटकातनुजा, । ", मागें फिरोनि येतां, कांतारी भेटला स्वयें अनुजा ॥ प्रण म न करून लक्ष्मण, विभुला सीतोक्ति सर्व आयकवी; । तच्छ्रवणें व्याकुल बहु झाला चित्तांत सुज्ञराय कवी. ॥ तों नि जे उटजा येतां, मार्गी होती अनेक अपशकुन; | हानीतें सुचवीती निर्जेदेहस्फुरण, मृग, शिव, शकुन. ॥ आल य जाउनि पाहे, तों सीता राघवासि भेटेना; । वाट, तसे ॥ त्या समयाहुनि दारुण मृत्यु, असें लक्ष्मणासि वाटेना. ॥ " रुचि राक्षा नाहीं कीं, वत्सा ! हें अन्यगेह वाटतसे; । इतरस्थलासि आलों, चुकती अनभिज्ञ लोक वत्सा ! म ज जरि म्हणसी, 'सीतेची हेच होय दलशाला; । तरि मीच रामनामा नसेन; साध्वी दिसेल काशाला ? ॥ ते म ज वांचुनि नाहीं गेली गोदावरीविहारातें; । क्षण मद्विरहें तीतें युग होतें; भार भावि हारातें. तें प्रि य तमा न हिंस्रे वधिली; नाहींच रक्त भूबरतें; । नेलीच राक्षसानें;' म्हणोनि शोधी स्थल क्षमावर तें. ॥ 'कोठें ज नकसुते ! तूं गेलीस? धरासुते ! प्रिये जाये ! । न करीं विनोद; झाला व्याकुल अत्यंत देह माझा; ये. ॥ तूं का य कोप धरिला ? अपूर्व मृग नाणिला म्हणून मनीं; । तरि चंद्रमृगहि आणुन देइन, हें तूं असल्यसें नं मनीं. ॥ a ^ 20 ७० ७१ ७२ ७३ ७४ ७५ ७६ १. पर्वत. २. सुमीवादि. ३. रेशमी वस्त्रबद्ध ४. दागिने. ५. मारीचा, ६. वनीं. ७. लक्ष्मणा. ८. नमस्कार. ९. सीतावाक्य. १०. ज्ञाता. (राम.) ११. स्वपर्णशालेला. १२. आपले अंगस्कुरण १३. मालवा. १४. पक्षी. १५. सीता. १६. अज्ञानी, न जाणते. १७. पर्णशाला. १८. घातकें. १९, पृथ्वीपति, (राम.) २०. मानूं नको.