पान:रामायणे भाग पहिला.pdf/६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मोरोपंतकृत ऐसें महोग्र वदतां, लक्ष्मण करि कर्णपाणिसंगतिला; । 'शिव ! शिव !' म्हणोनि वंदी, दुर्वाक्यश्रवणकंपितांग, तिला ॥ १२ 'हाहा श्री राम !' असें दुःखाकुल तो वदोन कर जोडी; । ५३ सीतेसि म्हणे, 'माते ! पापाची तूं वृथा न कर जोडी. ॥ माते ! रा हें स्वस्था; जातों त्वत्पादपंकजा नैत मीं; । साग्रज सत्वर येतों; मग्न करावें स्त्रचित्त तूं न तेंमी.' ॥ प्रैण म न करून गेला, नेला प्रभु ज्या पथेंचि मारीचें; । तो यतिवेष दशमुख हरण करी त्या धंराकुमारीचें ॥ व्याघें ज शी कुँरंगी, तशि नेतां राक्षसें धरूनि करें; । ‘हा लक्ष्मण ! हा रघुवर !' अशि सीता आरडे, रडे, निकरें. ॥ १६ 'जैसा य वन वधाया नेतो धेनूसि, हा तसाचि खल;' । ऐसें वदोनि रडती वनदेवी; तो पडे वनीं चिखल ॥ तो त्या रानीं होता दशरथनृपमित्र, गृध्रराज, बळी; । . सीताविलाप ऐकुनि, जाय नभी पंक्तिकंधराजवळी. ॥ पक्षी, म हापराक्रम, जटायु त्याला म्हणे, 'अरे चोरा ! । हो, राजकन्यकेला सोडुनियां, दूर बाष्कळा ! पोरा ! ॥ कां तु ज मृत्यूवदनप्रवेश रुचला ? गतंत्रपा ! सून | माझी सोडीं; लंका होऊ विधवा न आजपासून. ॥ हें का य दुष्टबुद्धे ! मूढा ! नीचा ! निशाचरापसदा ! | स्वकुळसमुच्छेदकर व्यर्थचि संपादितोसि पाप सदा.' ॥ ऐसें जरि हित कथिलें, तें रावण सर्व वाक्य परिसून, । तैसाचि जाय गर्ने; जटायुची सोडिली न परि सून. ॥ मग ये मदंडाशनिसमनिजचंचूपक्षपादनखराहीं । मोडुनि रथ, गृध्र म्हणे, 'मदायुधें पाहिलींस न खैरा ! हीं.' ॥ ६३ मग रावण अन्यायें, खड़ें छेदूनि गृध्रपक्षतिला, । अन्यरथीं स्थापुनियां, घेउनि गेला मनुष्यभक्ष्य तिला ॥ ५४ ५५ ५७ ५८ ५९ १. कानांवर हात ठेवणे. २. संपादन, मिळवणे. ३. नम्र. ४. दुःखीं. ५. नमस्कार. ६. सीतेचें. ७ हरिणी, ८. ९. रावणाजवळ, १०. हे निर्लज्जा. ११. हे राक्षसाधमा. १२. स्वकुलनाशक १३. यमदंडवतुल्य जीं स्वचंचू, पंख, पाय, नखें, त्यांहींकरून, १४. गाढवा. १५. जटायूचे पंखाच्या मूळांस. १६. राक्षस.