पान:रामायणे भाग पहिला.pdf/६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अरण्यकांड] ५. मंत्ररामायण. तेथें श्री कंठनिजश्यालोच्चतनू जटायुगृध्रातें । पाहुनि, सीता मानी निजचित्तीं पेक्षवन्महीध्रातें ॥ मग रा घवासि पुसतां, 'दशरथनृपमित्र मी' म्हणे 'गृध्र; । संपात्यवरज, कश्यपवंशज, नामें जटायु, न महीघ्र.' ॥ विश्रा म पावला बहु, जटायुला दिवस होय पैर्व तसा; । 'पंचवटीस वसा' हे सांगोनि उडे सपक्षपर्वतसा ॥ अनु ज कृतच्छदसदनीं, सदनिष्टविनाशदक्ष पादरज; । दर जगतीचें हरितो हेरितोषद, 'कोसलेशजोदरज. ॥ हैच्छ य विकला प्रार्थी शूर्पणखा राघवास 'अविदग्धा; । मृगजलपूरास जशी वनहरिणी, दाँवपावकविदग्धा ॥ रुचि राक्षी हेमंतीं, रघुनाथाला म्हणे, 'मला वरणें; । आवरणे समरखैरी, रक्षीं वीरा ! भुजामलावरणें.' ॥ तोसा म युक्तवाक्यें, राम म्हणे, 'मी असें सदार जनीं;। अस्त्रीक बंधु माझा; त्याला युग होतसे सदा रजनी ॥ जा, तुज वरील बलवान्, मजहुनि तो योग्य, हें मला वाँटे;' । ऐसें वदोनि, अंतस्मित लावी एकदां तिला वाटे. ॥ तेजा य लक्ष्मणाप्रति, धरूनियां रम्यरूपवेश 'स्त्री;। तीस विलोकुनि मानी रामानुज तो मनी जशी शस्त्री ॥ चिंत्त ज शराग्निदग्धा मी सुविदग्धासि तूज जैलदासी, । . आलें शरण शरण्या! रक्षावि स्वाधरामृतें दासी.' ॥ 'मी तो येँ जमुखि! राघवदास' म्हणे 'मज कशास वरतीस ? । जा तुज वरील राम, त्यजुनि अरण्या क्षमेस वैरेंतीस.' ॥ अशि राक्षसी अनार्या, येथेंही पावली न कामातें; । 2 १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ पुनरपि रामास म्हणे विनवुनियां, कीं, 'त्यजूं नका मातें.' ॥ २५ १. महादेवाचा स्वकीय मेहुणा जो मैनाक पर्वत त्यासारिखा उंच देह ज्याचा अशा जटायुप- क्ष्यातें. २. सपक्ष पर्वत अशातें. ३. संपातीचा कनिष्ठ बंधु. ४. पर्वत. ५. संक्रांसादिक पर्वासारिखा. ६. लक्ष्मणकृत पर्णशालेत. ७. साधूंच्या अकल्याणाच्या नाशाविषयीं दक्ष चरणरज ज्याचें असा. ८. भय. ९. इंद्राला संतोष देणारा. १०. कौसल्येचा पुत्र. (राम.) ११. कामविला. १२. मूर्खा. १३. वणव्यानें दग्धा असी. १४. कामरूप शत्रू. १५. बाहुरूप शुद्ध आच्छादनानें. १६. युगा- सारिखी. १७. भासे. १८. ती शूर्पणखा. १९. शस्त्रधारी २०. कामवाणपीडिता. २१. चतु- रासि २२. मेघासी २३. कमलवदने, २४ वरणारीस.