पान:रामायणे भाग पहिला.pdf/६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मोरोपंतकृत अम रा धिपापरी तो झाला विप्रांसि पूज्य सुखराशी, । प्रेखरासिबाणपाणी; लाजे रवि तैत्पदाब्जनखराशी ॥ आश्र म वासी मुनि ते सत्कारिति सुखभाव सुमतीला; । त्याकाळीं बहु लाजे गतप्रभा विधिसभा वैसुमतीला ॥ तों द्विज शत्रू राक्षस, विराध आला गिरी जसा ढळला; । सीतेला हरुनि पथीं, 'आहार' म्हणे 'बराचि आढळला.' ॥ दोघे बंधू, करितां युद्ध, स्वबाहुनी केवळी; । स्कंधीं वाहुनि निवता झाला तो सर्व आननें कँवळी. ॥ प्रख रा सी ते छेदिति, असतां स्कंधींच, बाहुदंडांतें; । निर्भय ते पुष्पवंत जाणों, दोघे करितात राहुदंडातें || तो, अम रप्रभ दुसरें देह धरुनियां, कथी सुसद्वृत्त । रंभालिंगनकुपित, द्रविणप्रदलब्धशाप हे वृत्त.' ॥ सानु ज राम तयाचा आच्छादी देह करुनियां पदर; । स्वर्गोत्सुकशरभंगस्थाना गेला, हरूनि विप्रदर. ॥ विनय पुरःसर नमिला मुनि तोही, पूजुनि प्रमोदानें; । गेला खेर्लोकातें, 'तैर्पुनिया पैविकासि तनुदानें ॥ मग जगदीश, सुतीक्ष्णद्विजाश्रमाला करोनियां काशी; । गेला अगस्त्यमुनिच्या स्वस्थानासी द्वितीयनाकाशी ॥ आम्ना य मूर्तिला त्या 'रोमोऽस्मि' असें कथूनियां वंदी; । बंदी होय अगस्त्यही, आघ्राण करी शिरीं मैहानंदी ॥ सत्कारा नंतर, दे आशीर्वादासवें 'धेरेशासी । ब्रम्हास्त्र, विष्णुकार्मुक, शकेषुधियुग्मरत्न, लोकासी. ॥ प्रण म न करूनि मुनिला, गेला तेथूनि राम वैल्कपटी । गोदावरीतटीं त्या पंचवटीतें वधावया कपटी. ॥ २ ३ ४ ५ ६ ८ १० १२ १३ १. इंद्रासारखा २. तीक्ष्ण खड्ग आणि बाण हातामध्यें ज्याच्या असा. ३. त्याच्या पदक- मलनखासि. ४. पृथ्वीला ५. कौटाळी. (दोहों हातांमध्यें धरी, असा भाव.) ६. मुखें. ७. ग्रासी. ८. तीक्ष्ण आहे खड्ग ज्यांचे असे. ९. सूर्यचंद्र, १० स्वर्गमनोत्कंठित शरभंग ऋषीच्या आश्र- श्रमास ११. विप्रभीति १२. नम्रतापूर्वक. १३. हर्षे. १४. स्वर्गलोकास. १५. रून. १६. अग्नीस १७. दुसऱ्या वर्गासच. १८. वेदमूर्तिला. १९. राम आहे. २०. स्तु- तकर्त्ता, २१ मोठा आनंद ज्याला असा. २२. पृथ्वीपतीस. २३. वल्कलरूप वस्त्र धारण करणारा. क-