पान:रामायणे भाग पहिला.pdf/५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५२ मोरोपंतकृत म ज तें इष्टचि शापप्रदान गमले तदानपत्याला; । मग वृद्धासह दिधला तद्वाक्यें वन्हि मी वनीं त्याला ॥ भ य तेंचि मनीं होतें, केवळ माझेंचि कर्म मज फळलें; । या सुतशोकें घडतें मरण; मला निश्चयेंचि हे कळलें ॥ हें राज्ञीला सांगुनि, पुत्राचें करुनि मानसीं स्मरण, । 'हा राम ! राम!' ऐसा विलाप करितांचि, पावला मरण. ॥ या म रणीं, चार जरी पुत्र, तरी एकही न याजवळी; । तेव्हां होता सानुज भरत, नृपाज्ञे करूनि आजवळीं ॥ द्वि ज वर वसिष्ठ ठेवुनि तैलेंद्रोणींत भूपदेहातें; । 'दे हातें पुत्र' म्हणे 'भरतासि,' सुमंत्र करि, वदे है। तें ॥ नै य वित् चार प्रेषुनि, न कळत आणोनि, सांगती 'तातें । केलें स्वर्गमन, तुला अर्पुनियां सर्व भूमि भरतातें.' ॥ हें जननीचें चरित श्रवण करुनियां, सखेद, फार रडे; । दंडाहत भुजग तसा कोपें मातेकडे तदा मुरडे. ॥ 'प्रिय वधिला पापिष्ठे !, धाडुनि विपिनासि सद्गुणकरंडा; । केली अकीर्ति, आपण झालिस, पापाशयें, स्वयें रंडा. ॥ वें तुज पापे !, परि म्हणतो रामराय माय तुला; । यास्तव उपाय नाहीं; गैरलाची तुजचि योग्य काय तुला ? ॥ यम कार्यकारिणी तूं कृत्या, मोहूनि यास विश्वास । मा रा पत्नी होउनि निळिला राजा, माझा पिता, सेविश्वास ॥ न्ही श्री दया जयाच्या ठायीं, जो स्तुत्य या जनामाजी; । त्याला वनासि धाडुनि, केली तूं काय कामना माजी ? ॥ तूं राक्षसीपरीसहि अधमा, जे निजकुटुंब खातीस; । मीही पाप तुझा सुत,' हें बोले होय पौरखा तीस. ॥ विम ना भरत केशें कौसल्येच्या पदावरी लोळे; । डोळे उघडुनि, हृदयीं धरुनि, रडे राम मानसीं घोळे. ॥ . . ७० ७२ e ७४ ७५ ७७ ७८ ७९ ८० ८१ ८२ १. आजाचे घरीं. २ तेलाचे कढईत ३. वमिष्ठ. ४. नीतिज्ञ दूत. ५. स्वर्गास गमन, ६. विषाची. ७. उपमा. ८. जगास ९. विश्वासयुक्त. १०. माझी. ११. विमुख, परका.