पान:रामायणे भाग पहिला.pdf/५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अयोध्याकांड] ५. मंत्ररामायण. तु ज वंदुनियां येथुन गेला रघुवीर शृंगवेरातें; । झाला पूज्य गुहातें, जैसा गौरीपती कुबेरातें. || पय फल भनुनि, रचिल्या वटदुग्धे त्या स्थळीं जटा रामी; । त्या देखिल्या सुहृज्जनहृदयाच्या भेदित्या कुठारा मी. ॥ ते रा जसुता सीता सेवितसे प्रेमयुक्त कमलाक्षा; । जीचे, वनसंचारें, दिसती पद रक्त, जरि नसे लाक्षा. ॥ ग म नश्रम न गणुनि, तो लक्ष्मण दृढ मानसीं, जसा अशनी; । स्वकरकृताग्रजशयनाजवळचि जागे निरिच्छ जो अशनीं ॥ से ज लघनश्याम मला 'जाणें' ऐशा करी नियोगातें; । गंगेला उतरोनी, गेला, देवोनियां वियोगातें.' ॥ आ य कतां हें मूर्छित झाला नृपती; तयासि कौसल्या । जलवातकरस्पर्शे सावध करि, दावुनी स्वकौशल्या. ॥ अ ज सुत रात्रीं स्मरतां स्वकर्म, महिषीस सर्व निजवृत्त । सांगे, कौसल्यांकस्थितमस्तक, ॲस्तशक्ति, सद्वृत्त. ॥ 'तो'य जदलाक्षि ! पूर्वी मी, मृगयालुब्ध, एकदा राती । शरयूतीरीं होतों, शरपाणी, एकटा, मृगाराती ॥ नी रा दानागतमुनिपात्ररवाकर्णनें अजाणानें, । तापस, गजभ्रमानें, वधिला मी, शब्दपाति बाणानें ॥ म म बाणविद्ध तापस 'हा तात !' असें म्हणोनि आरडला; । तों मीं धांवत जाउनि विलोकिला तो, धरेवरी पडला. ॥ 'हाश्री मुने ! तुझा मी निष्कारणशत्रु वध्य; संकृपा हें । हस्तीभ्रमेंचि घडलें पाप अयोध्यापतीस मज पाहें.' ॥ हे, राज्ञि ! वाक्य ऐकुनि, 'जननीजनकासमीप ने मातें;' । ऐसें सैशैल्य तापस वदतां केलें तदीय कामातें ॥ हें में दुष्कृत जाणुनि, अंधें, वृद्धे, सकोप, तत्पितरें । म्हणती, 'त्वां ही मरणें सुतशोकें यापरीच तप्ततरें.' ॥ ५१ 3 ५८ ५९ ६० ६५ १ लाख २. वज्र. ३. भक्षणीं. ४. राम. ५. आज्ञेतें. ६. कौसल्येच्या मांडीवर ठेवलें मस्तक ज्याणें असा. ७. नष्ट झाल्या सर्वशक्ति ज्याच्या असा. ८. सुखभाव. ९. हे कमलाक्षि १०. उदकग्रहणार्थ आला जो मुनि त्याच्या पात्रशब्दश्रवणेकरून ११ सदया. १२. बाणाय आहे हृदयीं ज्याच्या असा. १३. माझें दुष्ट कर्म.