पान:रामायणे भाग पहिला.pdf/५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५० मोरोपंतकृत 'जा य' सुमंत्रासि म्हणे राघव 'रघुवंशभवनदीपासी; । सुखरूप बसें.' आपण गेला हरिपादभवनदीपासीं ॥ तो रा म सुरनदीतें मग गुहनौकाश्रयेंकरूनि तरे; । मायानदीस जैसा जन याच्या भक्तिसंश्रयें उतरे. ॥ 'ने म जला सांगातें, लक्ष्मण जैसा तसेंचि मज लेख;' । हें वदतां तो वारी गुहासि सामोत्तरें मैनुजलेख. | द्वि ज तरुलताढ्य आश्रम रामाच्या दे नितांत मोर्दै मना; । जेथ भरद्वाजरुचि प्रकाशितां भू हंसे तैमोदमना ॥ न य कुशल राम वंदी शिरीं भरद्वाजपादकमलातें; । तो हृदयीं आलिंगुनि वर्षे सानंद बाष्प कमलातें ॥ पूजन करूनि, आज्ञा, आशीर्वादासमेत, दे सुमुनी; । तत्तापासह राघव गेला, तेथूनि, तत्पदें नमुनी ॥ भय वर्जित, जाउनियां, वसवी तो चित्रकूट शैलास; । जैसा सेनानीचा तात, शिंवानाथ, देव, कैलास. ॥ थो रा श्रमें सुमंत्रही, जाउनि नगरी, अजात्मजास नमी; । नृप त्यास म्हणे, 'दुःखें, झालों बा ! आज यमपथासन मी. ॥ तो मत्पुत्र सुखी कीं? जो म्यां पापें वनास घालविला; । हें काय योग्य केलें? बापा ! आनंददीप मालविला. ॥ हे 'श्री भारावह मज, यश गेलें, रात्रिदिन मनीं झुरतों; । जैलदाभकाय, पंकजनयन, न येतां घरास, मी मरतों ॥ मि' श्री म्हणोनि वदनीं निजहस्तें घातली पहा सिकता; । कैकेयीस वरुनियां, वश झालों, नीति शिकविता सिता. ॥ त्यां राजीवदलाक्षे कथिलें मज काय ? सांग तद्वृत्ता; । सौमित्रि काय बदला ? सीता आहे कशी सुसद्वृत्ता. ?' ॥ या में नुजेंद्रोक्तीतें श्रवण करुनि, तो सुमंत्र त्यासि म्हणे, । 'वज्रहृदय मी निर्दय कथितों तें सर्व ऐक राजमणे ! ॥ ४४ ४५ ४६ ४७ ४८ ४९ ५० ५१ ५२ ५३ ५४ ५५ १. गंगेपास. २. गण. ३. नरदेव. ४. आनंद. ५. सूर्यास. ६. कार्तिकस्वामीचा. ७. उमापती. ८. दशरथास. ९. यममाग रहाणारा. १०. या मंत्राच्या रचनेच्या संबंधानें उपोद्घातांतील ८ वी गीति पहावी. ११. मेघनुल्यदेह १२. साकर. १३. वाळू. १४. शिकणारा. १५. दशरथाच्या भाषणातें.