पान:रामायणे भाग पहिला.pdf/५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अयोध्याकांड] ५. मंत्ररामायण. राय असें आयकतां, 'हाय !' म्हणे 'बायको नव्हे, कृत्या; । काय करूं? जाय वना वा ! यश जोडीं, करूनि सत्कृत्या.' ॥ तों राक्षसी तशी ते रामातें 'वल्कलें' म्हणे 'धरणें; । चवदा वर्षे विपिनीं राहुनियां, आत्मतात उद्धरणें.' ॥ श्र मन गणुनि, सावरजें रामें केलें तिच्या मैनासारें; । वल्कल धरितां भिजली परभू जननेत्रजीवनासारें ॥ गज गति सुकुमार अशीं तिघें निघालीं वनासि पदचारें; । स्वरध दशरथ प्रेषी, सुमंत्रमंत्रिप्रयुक्तसुविचारें ॥ तो य जपत्राक्षातें तो यजमानाचिया निदेशाला । भि ज कथुनि, प्रार्धुनि, यानीं स्थापुनियां, ने तंदिष्टदेशाला ॥ विति सज्जन पौर क्षोणीला बाष्पजीवनासारें; । जाती रामासह ते; पुर भासे त्यांसि पितृवनासारें ॥ पा य धरुनियां म्हणती, 'रामा! आम्ही तुझेचि सांगाती' । रडती, पडती पढ़ती स्तोत्रे, त्याच्याचि कीर्तिला गाती ॥ पौ रा ग्रहासी जाणुनि, निजल्या स्थानीं, करोनीयां मंत्रै,। आमंत्रण न करुनियां, वंचुनि, निशि जाय राम ससुमंत्र ॥ अ म रनदीच्या तीरीं गेला रघुवीर 'शृंगवेरातें; । तेथें गुहनाम वसे निषादपति, जो हंसे कुबेरातें ॥ तो, श्री दशरथनंदन आला, हें ऐकतांचि, संप्रकृती । येउनि करी सपर्या, वृत्तश्रवणें सखेद, सुप्रकृती. ॥ 'सारा विभव तुझा मी दास' म्हणे 'ये पुरासि अवनाला; । राज्य प्राज्य करावें, यॉन करावें कदापि न वनाला.' ॥ सा म पुरःसरवाक्यें, राम म्हणे, 'या मदीय नेमातें । रक्षावें धर्मज्ञा !; तोषविलें त्वां सुहृज्जनें मातें.' ॥ रजनी पदिपमूळी वाहुनि, पावोनियां प्रभातासी, । वंदी रविला; ज्याची नित्य तमाला महाप्रभा तौंसी ॥ ४९ ३१ ३२ ३३ ३५ ३६ ३७ ३८ ३९ ४१ ४२ ४३ १. तामसदेवताविशेष. २. कनिष्टधुसहितें. ३. मनासारखें. ४ लोकांच्या नेत्रसंबंधी उदका- च्या दाट वृष्टीनें. ५. कमलपत्राक्षातें. (रामातें.) ६. आज्ञेला. ७. रथीं. ८. त्या रामाला इष्ट जो देश व्याप्रत. ९. स्मशानतुल्य १०. म्हणती. ११. मसलत १२. पुरविशेष. १३. प्रधानासह १४. पूजा. १५. संपत्ति १६. रक्षणाला. १७. गमन. १८. वृक्षंमूळीं. १९. प्रातःकालासी. २०. तासून टाकी, क्षीण करी. ७