पान:रामायणे भाग पहिला.pdf/५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४८ मोरोपंतकृत आ य कतां राम म्हणे, 'माते ! देवारिंचा रिपु त्रास । सैत्यविनाशापासुनि कां धरितो ?' निर्मुनीहि पुत्रास ॥ हा रा राज्यभार सारा भरतें घ्यावा शिरीं, जरी श्रमही; । पितृसत्यत्राणास्तव, मी सेवावी सुखें अरण्यमही.' ॥ स्वमत प्रकट करुनियां, रघुपति तीतें करूनियां नमनः । गमन करी धैर्यार्णव, ज्याचें तिळमात्र भंगले न मन ॥ नि ज मातेला सांगे राघव भरतप्रसूचरित्रास; । तें ऐकतां, धरी ते पतिसुतदुःखें मनीं परित्रास ॥ भय शोकासह हृदयीं रामासि धरूनि, माय फार रडे; । बाष्पोदकें सेचैल स्नैपन तदा त्या रघूत्तमासि घडे ॥ 'म ज ही समागमें ने. तुज वांचुनि ही पुरी मला कारा;' । ऐसें वदोनि हृदयीं घट्ट धरी ते सुनिर्मलाकारा. ॥ शेय जोडुनि राम म्हणे, 'जननि ! उपेक्षूं नको पिता माझा; । कैकेयीशब्दशरक्षत, 'मैद्विश्लेषविकल, हा राजा.' ॥ हा राज्ञी सुतशब्द श्रवण करुनि, होय ते विगतहारा; । 'हाँ राम !' म्हणोनि करी उरी प्रहारासि 'वर्जिताहारा ॥ न म न करुनियां निघतां, न शके माता सुतासि वरजाया; । जायाहि निधे त्याची, लक्ष्मणही सिद्ध जाहला जाया ॥ ते श्री काय पुरीची, 'सीताव्याजें, रघूत्तमासहित, । जाणोनियां निघाली, निवारितांही, प्रियोत्तमास हितैं. 11 हें रा यासि कथाया, कैकेयीच्या स्वकीयगेहातें । जाउनि, सुमंत्र वाक्यें कळवि, नमुनि तातपादयुग हातें. ॥ सु म ति सुमंत्रहि विनवी कैकेयीतें अनेकवचनांहीं; । परि तैरुक्तिबाणें न फुटे ऐसें जनीं कवच नाहीं ॥ 'तु ज वनवास बरा कीं, ताताला नरकवास, ' हें अदया, । निर्लज्जा, कैकेयी रामासि पुसे महादृषद्धृदया. ॥ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० १. दैत्यांचा. २. सत्यनाशापासून. ३. कैकेयीच्या चरित्रास. ४. नेत्रोदकें. ५. सवस्त्र. ६. स्रान. ७. बंदिशाला. ८. अतिनिर्मलरूपा (रामाला.) ९. हस्त. १०. कैकेयीच्या वाग्वाणें विद्ध ११. माझा वियोगानें विव्हळ १२. हाररहिता १३ हाय. १४. आहार सोडलेली अशी. १५. सीतामित्रानें. १६. हितकर १७. म्हणणे १८. त्या कैकयीच्या दुर्भाषणरूपवाणानें. १९. महापाषाणाचें आहे हृदय जींचं.