पान:रामायणे भाग पहिला.pdf/५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अयोध्याकांड.] ५. मंत्ररामायण. स्वी य सुतातें राज्यप्राप्ति असावी म्हणोनि, मानवती । रामाभिषेकसमयीं विघ्न करी; त्यासि देव मानवती ॥ त्या राजेंद्रे केले, जाउनि, सामाद्युपाय, जे असती; । तरि समजेना, जडली तीस पिशाचीच मंथरा असती. ॥ 'दे म त्सुतासि पृथ्वी, अॅटवी रामासि,' हें वदोन, वैर । सत्यप्रतिज्ञ मूर्छित केला, मागोनि हेच दोन वर. ॥ निज सुतवियोगविव्हळ, सत्यच्युतिभीत, तो असा विनवी; । 'कैकेयि ! तुझ्या ठायीं निर्दयता हे अशी नसावि नवी ॥ वय माझें बहु गेलें, पुत्रोत्पत्त्यर्थ यत्न बहु केला; । त्याशीं वियोग करितां, न कशी धरिशी मैदंतशंकेला ॥ तु ज राज्य सर्व दिधलें, आणिकही माग जे अभीष्ट तुला; । गुणवदपत्यवियोगक्लेशासि जगत्रयीं नसेची तुला ॥ का य तुझा रामानें केला अपराध ? सांग गे प्रमदे ! । कां माझ्या बाळावरि करिसी हा कोप ? सांग गे श्रमदे ! ॥ हा राज्ञि ! पुत्र माझा सुकुमार, कुमार, बहुविनीत, कृती; । त्वत्पदलीन, तरीही, याविषयीं कां तुझी अशी प्रकृती ? ॥ कां म ति धरिली नंदनवियोगवन्हींत कांत होमाया ? । कां मज वृद्धावरिली कैकेयी ! त्यागिली अहो ! माया ? ॥ हे, श्री पतिप्रसादें, वृद्धपणीं पुत्र जाहले चार; । हें जाणुनि, हें वर्तसि, झाला तुज काय भूतसंचार ?' ॥ त्यारा यें कैकेयीगुणें, करूनी तदा विलापातें, । स्त्रीतें, पुत्रवियोगें होणार प्रांत, दाविला पाँतें. ॥ तों में ध्यममातेच्या गृहासि जाऊनि जों पहातात; । ४७ ५ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ राघवलक्ष्मण, मूर्छित जनक त्रिलोकूनि, म्हणति 'हा तात !’ ॥ १६ तें ज ननीला पुसतां मूछेंचें कारण स्वयें राम; । पूर्वकथा सांगुनि ते प्रकट करी आपुला मैने:काम || १. स्वपुत्रातें, २, मानिनी. (कैकेयी.) ३. दुष्टा. ४. अरण्य. ५. नवरा. ६. माझ्या नाशाच्या शंकेला. ७. इच्छित. ८. गुणीपुत्रवियोगशासि. ९. तुलना, बरोबरी. १०. हे स्त्रिये, ११, त्रास देणारे. १२. अतिनत्र. १३. पतनानें १४. कैकेयोच्या. १५. मनोरथ.