पान:रामायणे भाग पहिला.pdf/५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मोरोपंतकृत महदुत्सवें विवाहीं अर्पी नृप जांवयासि नैगराशी; । पूजुनि पंक्तिरैथातें, आज्ञा दे जावयासि नगराशी ॥ श्रीकंठशिष्य भार्गव, शिवचापध्वंसकुपित, आला जो; । हरिलें तयश रामें जें, त्याला कां न चंद्रमा लाजो ? ॥ राग मनांतिल पहिला जातां, दुसराचि रंग मग झाला; । महदानंदें भार्गव गेला, निववूनि कँपटमनुजाला ॥ जयशाली राघव तो करी अयोध्यापुरीं प्रवेशास; । यत्न न करितां जिंकुनि बाहुजकाळास, विप्रवेशास ॥ राजा, पुत्रचतुष्टयलार्भे, अनुरूपतद्वधूलार्भे । 'मत्सम सुखी न कोणी लोक' म्हणे 'मृत्युचेंहि न मला में". ॥ जन, हृत्पनीं पावे सुख वृद्धीतें, तसें नसे फार; । यशही वाढे सभीं, रघुवीर जसा जसा 'मँहोदार || जंगतीहत्तापातें हळू हळू कीर्तिभाधिपें विझवी; । यत्नं करूनि सज्जनचित्तातें सच्चरित्र तो रिझवी. ॥ राज्यसुखाहुनि दशरथ पुत्रसुखें हृष्ट पुष्ट झाला; जे । मर्चेतर तत्पतिही कश्यपही त्यासि सुप्रजा लाजे ॥ अयोध्याकांड. ‘स्व श्री ज्येष्टसुतातें द्यावी' हे मानसांत नृप आणी; । दिधलें वसिष्ठमुनिनें अनुमोदन, ऐकतां अशी वाणी ॥ सारा सारविचारप्रवीण मुख्य प्रधान जे होते; । पुसतां हैं, नृपतीतें म्हणती 'लोकेष्ट' सर्वही 'हो' ते. ॥ मोमर वसिष्ठ पाहे, हर्पातें आंवरूनि, योगाँतें; । अभिषेकाचें करवी साहित्य, करूनियां नियोगतें ॥ अ ज सुतचिकीर्पितातें जाणुनियां, शीघ्र मंथरा दासी । कैकेयीला सांगे; ते तो पावे महाविपादासी ॥ ६९ V ^ ६९ ७० on ७२ २ ३ ४ १. जामातास २ दागिने ३ दशरथातें. ४. झा मंत्राच्या रचनेच्या संबंधानें वरील उपोद्घातांत ८ वी आर्या पहावी. ५. क्रोध. ६. प्रीति ७. रामाला. ८. क्षत्रियनाशकास. ९. भय १०. मोठा उदार. ११. पृथ्वीच्या हृदयसंबंधी संतापातें १२. ब्राह्मण १३ ग्रहादियोगातें, १४. आज्ञेतं. १५. दशरथाच्या मनोरथातें.