पान:रामायणे भाग पहिला.pdf/५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बालकांड.] ५. मंत्ररामायण. श्रीसूर्यवंशमणि तो करि पुत्रांचीं येथोक्त उपनयनें; । संतत अतृप्तचित्तें सेवी तैन्मुखरुचीस नृप नयनें ॥ राक्षसपीडाव्याजें कौशिक मागोनि दशरथाजवळी, । हृदयीं रोमाभिधनिजपुण्यफळातें महासुखें कवळी ॥ महामर बलातिबला विद्या दे, क्षुत्तृषार्तिहरणार्थ; । अर्पी धनुःश्रुतीतें, सज्जनरक्षार्थ, दुष्टमरणार्थ ॥ जन्य कराया, रोधी मुनिच्या मार्गासि ताटका चंडी; । विश्वामित्रनिदेशें तीस वधी सर्वलोककोदंडी ॥ यश जोडाया, जाउनि सानुज विभु आश्रमास, यज्ञाचें । त्राण करी; असुरवधें मन सुखवी मंत्रसंचयज्ञाचें ॥ राजा जनक मुनीतें, वक्रतुसिद्ध्यर्थ, धाडुनी मंत्री, । 'दर्शन देउनि मातें धन्य करावें' म्हणोनि औमंत्री ॥ मर्याकृतिला विभुला नेतां, मार्गी कथी पुरोवृत्ता; । चरणें गौतमजाया उद्धरवी, कौमसुखपरावृत्ता ॥ जनकपुरा मग जाउनि, भंगुनि ॲवचापदंड बाळपणीं । कौशिकमुनिप्रसादें, जिंकी रघुवीर जानकीस पणीं ॥ यतचित्तें त्या जनकें, धाडुनि शिविकीरथेभवाहातें, । दशरथ, पूर्णमनोरथ, 'सीतःपुर, आणिला, विवाहातें ॥ जनपदजन बहु तेव्हां मिळते झाले कवि प्रभूपयमीं; । गंधर्व, यक्ष, चारण, किंनर, सुरलोक, विप्र, भूप, ग्रॅमी. ॥ यज्वा जनक, खौरेंस कन्या जे ऊर्मिला, तिचा पाणी । लक्ष्मणवीराकरवीं धरवी; तें लोक फार वाखाणी ॥ राजाचा अनुजन्मा, कुशध्वजाख्य प्रसिद्ध, तो कन्या । श्रुतकीर्ति रिपुंन्नाला दे; भरतालाहि मांडवी धन्या. ॥ ४५ AU ५४ ५५ १८ ५९ ६२ १. यथाशास्त्र. २. व्रतबंध, मुंजी. ३. त्या रामाच्या मुखशोभेस. ४. राक्षसपीडेच्या भिषानें. (कपटानें.) ५. रामरूपस्वपुण्यफळा. ६. ब्राह्मण. ७. विद्याविशेष ८. धनुर्विद्येतें. ९. युद्ध. १०. मंत्रसमूहज्ञविश्वामित्राचें. ११. बोलावी. १२. पूर्वी झालेल्या गोष्टीला. १३. विषयसुखापासून मागें फिरलेली. १४. शिवधनुष्याचा दंड. १५. पालखी, रथ, हत्ती, घोडे, यांतें. १६. सस्त्रीक. १७. रामलीं. १८. योगी १९ यज्ञकर्ता, २०. आपल्या स्वजातीय स्त्रीचे ठायीं झालेली. २१. कनिष्ठ बंधु. २२. शत्रुघ्राला,