पान:रामायणे भाग पहिला.pdf/५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मोरोपंतकृत श्रीकांत, वदोनि असें, अदृश्य होतां, स्वयें तदा ज्ञाते । ब्रह्माद्यमर यथोक्त प्रवर्तले, नमुनियां तदाज्ञा, ते. ॥ राशि तपाचा काश्यप मुनि पुत्रेष्टी करी, तदा निकट | प्राजापय पुरुष, त्या कुंडापासूनि जाहला प्रकट. ॥ मनुजेंद्रकरी देउनि पायसपरिपूर्णहेमपात्रातें, । 'दे मायसि' म्हणे 'हें होइल भवसागरीं नृपा त्रातें.' ॥ जन्म सफल मानुनि, तो स्वपायसाचे करोनि युग भाग, । कौसल्येला देउनि, कैकेयीलाहि दे महाभाग. ॥ यद्यपि भूपें न दिला भाग सुमित्रेसि, तरिहि त्या तीतें । निजभागार्ध समर्पुनि, आनंदविती अपार नृपतीतें || राय, यजनावसानों, विभांडकसुतादिभूसुरसभा जी, । मणिहारादिविभूषणनिवेदनें, नंतिपुरःसर, संभाजी ॥ महिषी अंतर्वत्नी होउनियां, त्या तनुप्रभानिकरें । चिंतातमासि जिंकिति, नृपसुखपृष्टासि थापटोनि करें ॥ जनकल्याणदशोभनकाळी त्या प्रसवल्या नरेशस्त्री; । ते वेळा झाली तैं बंधनविच्छेदनक्षमा शस्त्री. ॥ यज्ञेश्वर कौसल्येपासुनि पावे सैदिष्टजननास; । यास्तव होणार जगीं सज्जनकल्याण, दुष्टजननास ॥ जन्म ज्येष्ठसुताचें, मध्यान्हीं, चैत्रमाससितपक्षीं । ४४ झालें, कर्कटलग्नीं, नवमीदिवशीं, पुनर्वसुस्वर्क्षी ॥ थैंमल सुमित्रा प्रसवे, यमलक्षण जे असाधुलोकांचे; । ऐका ते साकेताधिप करि संस्कार सर्व तोकांचे ॥ असें दशरथ नृप अँन्वर्थ ज्येष्ठसूनुचें नाम । ठेत्री; भरत असें तो कैकेयीजास, लब्धनिजकाम. ॥ महदानंदें, दशरथ भूप सुमित्रासुतांसि सुविधानें । लक्ष्मण शत्रुघ्न अशीं ठेवी सारीं यथार्थ 'अभिधानें ॥ राम ४० ४१ ४२ ४३ ४४ x ४९ ५० ५१ ५२ १. प्रजापति देवता ज्याची असा. २. रक्षणकरें. ३. दोन. ४. ऋष्यशंगादिविप्रसभा ५. नमस्कारपूर्वक. ६. पूजी. ७. गर्भिणी. ८. दशरथसुखाची पाठ. ९. जनाला कल्याण देणारा आणि चांगला अशा काळी १०. तरवार. ११. साधूंना आवडलेल्या जन्मास. १२. दुष्टांचा नाश. १३. पुनर्वसु झा उत्तम नक्षत्री. १४. बु १५ यमासारखें १६. यथार्थ १७, कैकेयी- पुत्रास. १८. नामं.