पान:रामायणे भाग पहिला.pdf/४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बालकांड.] ५. मंत्ररामायण. राष्ट्राच्या क्षेमास्तव त्याला नेईल लोमैपाद, तदा । होईल वृष्टि, तेव्हां देइल शांता सुता स्ववांछितदा ॥ मनुवंशज दशरथ नृप असेल अनपत्य, लोमपादसख; । तो त्या मुनिप्रसादें पावेल अनन्यलभ्य पुत्रसुख.' || जैननार्थ नंदनाच्या प्राथुनि तो ऋष्यशृंग आणावा; । अनपत्यतासुखद्रुम मुनिप्रसादें समूळ खाणावा. ' ॥ यजमानें अजपुत्रें हैं ऐकुनि, जाउनी, पदीं नमुनी, । सत्कारुनि, शांतेसह, नगरा नेला कृपानदीन मुनी ॥ राघवधृतपद, काश्यपपुत्रवसिष्ठप्रभृत्यवन्यमर । यमेधासि, यथाविधि, संपादिति वेदनीरजभ्रमर ॥ मग पुत्रेष्टी करितां, हविराहरणार्थ, भूमिवर लेख । आले विधि, सुरनायक, चूडारत्नीकृतर्क्षवरलेख. ॥ जंगदीश्वरनिजनाभीसरोवरोद्भूतपद्मजनितातें । म्हणती रावणपीडित सुर 'रक्षावा रूंकीयजन तातें. ॥ यमसम पीडा करितो तो खळ; आम्हांसि मरण ही नाहीं; । तद्दलपराजितांहीं किजे कसें त्यासम रण हीनाहीं ?" ॥ जलजोद्भव, हें परिसुनि, जाय सुरांसहित सिंधुकूलातें; । तेथें स्तविता झाला श्रीशातें, सज्जनानुकूलातें ॥ यजितां, अजित प्रकटुनि देवांला दर्शनें सुखी करवी । शेरेणागतजनसंसृतिभीतिध्वांतप्रभंजनैकरवी ॥ पिंकजप्रवण ॥ राजीवलोचनें त्या देवोक्तांचें करोनियां श्रवण, । 'मी भैष्ट' अशा शब्दें तोषविले मधुमथन म्हणे, 'जन्मुनि दशरथदारोदरीं, जगद्वेषी । मारीन; तुम्हीं व्हावें स्वांशानें वानरक्ष सद्वेषी.' || ४३ २८ २९ ३० on ३२ ३३ ३४ ३५ ३६ ३८ ३९ १. राजविशेष २ 'स्वमनोरथपुरका ३. उत्पत्यर्थ. ४. अनपत्यता दुःखवृक्ष. ५. कृपा- समुद्र. ६. काश्यपुत्रवसिष्ठप्रभृतिब्राह्मण ७. देव. ८. शिरोभूषणीकृत आहे चंद्र ज्याणें. ९. जगदीश्वराच्या नाभिकमलापासून झाला जो ब्रह्मा त्यातें. १०. स्वकीयभक्त ११. समुद्रतीरातें. १२. शरण आले जे जन त्यांच्या संसारभयरूप अंधकाराचा नाश करणारा एक सूर्य. १३. भिऊं नका. १४. आपल्या चरणकमलीं नम्र असे. १५. वानर व आस्वल,