पान:रामायणे भाग पहिला.pdf/४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मोरोपंतकृत राजप्रिया अयोध्या कोसलदेशी यथार्थनामा जी; । तीतें अजसुत दशरथ पाळी, जो ख्यात या जनामाजी ॥ महावनप्रौढकरें, धर्मपरें, देवकार्यसिद्धिकरें; । दशरथनृवरें केलें त्रिभुवन धवल स्वसद्यशःप्रकरें ॥ जगतीपतीस होत्या सार्धत्रिशत प्रिया अजश्रेष्ठा; । कौसल्या, कैकेयी, आणि सुमित्रा तयांत ही श्रेष्ठा. ॥ यमनियमें, पुत्रार्थ, क्षितिपें, सुरपूजनाद्यधीनमनें, । इच्छादानें, मानें, तोषविले मंदधी, सुधी नमनें ॥ राजास सौख्य कांहीं प्राप्त न झालेच पुत्ररत्नाचें; । यास्तव चिंताकुल तो मानी वैफल्य सर्व यत्नाचें ॥ 'मनुवंशीं जन्मुनियां, झालों अनपत्य मी, न लोक मला; । यास्तव हयमेधीं हे द्यावी द्विजहस्तकी' म्हणे 'कैमला.' ॥ जनपति मग यज्ञास्तव वसिष्ठमुखमूसुरांसि तो प्रार्थी । त्यांहीं तोषविला बहु आशीर्वादें नृपाल पुत्रार्थी ॥ 'यंजनाचें साहित्य क्षिप्र करीं' यापरी अनुज्ञा ते । ४२ करुनि, येथागत गेले वसिष्ठमुख भूमिनिर्जर ज्ञाते. ॥ जयशाली भूप म्हणे मंत्रिजनाला, 'समस्त संभार । सरयूतीरीं करणें, तुम्हांवरी हा असे महाभार.' ॥ यत्नें साहित्य तदा करोनियां ते प्रधान यज्ञाचें । आनंदविती मानस कौसल्याजानिचें, नयज्ञाचें ॥ राजेंद्रासि म्हणे तो सुमंत्रनामा प्रधान ॲनवीन । 'आज्ञा असेल तरि मी हितकाम तुझ्या पदास विनवीन || मनुजाधीशा! वदला भविष्य पूर्वी सनत्कुमार मुनी; । तें आयकिलें ऋषिजनवदनें मीं, तत्पदांबुजी रमुनी.' ॥ श्रीविधिनंदन वदला 'आद्ययुगीं कीं विभांडकर्षिसुत । मुनि ऋष्यशृंगनामा होइल, सैंवृंदवंय, लोकनुत ॥ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ १. पृथ्वीच्या रक्षणाविषयीं दक्ष हस्त ज्याचा असा. २. स्वकीर्तिसमूहानें. ३. साडेतीनशें. ४. दशरथास ५. देवपूजादिवश मन ज्याचें असा. ६. निरर्थकत्व, ७. संपत्ति, ८. वसिष्ठादिग्रा- ह्मणांस. ९. यज्ञाचें. १०. आज्ञा. ११. आले तसे. १२. कौसल्यापतीचें. १३. जुना, १४. साधु- समूह ज्याला नमस्कार करतो असा. १५. लोकस्तुत.