पान:रामायणे भाग पहिला.pdf/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मोरोपंतकृत स म वारा या न शके, मग बंधुस सीतेस, उचित मानुनि, घे । स्वगुरुजनासि पुसाया, हर्षे रविवंशपद्मभानु निधे ॥ जावुनि मातेसह सुमति सुमित्रेस, अनघ रागेला । नमना कैकेयीच्या, तो भक्तमयूरघन, घरा गेला. ॥ निज जनका राम म्हणे, 'दे आज्ञा, पाय वंदितों बा ! हे. । राहे लक्ष्मण न, पुरी सिद्धा सीता हि जाहली आहे.' ॥ भय सोड्डुनि, कैकेयी निर्दयहृदया करी महा जाच. । ९ ती श्रीरामासि म्हणे, 'चवदा वर्षे वनीं रहा, जा च ॥ द्विज वन्यवृत्ति जैसा, चवदा वर्षे तसाचि हो, राजा । सत्यव्रत, तूं जाशिल, मग जेविल; आजि भव्य होरा, जा.' ॥ १० पय देणारी विष दे, नेसाया वल्कलें पुढे ठेवी । 0 १२ लोभे भ्रमली बहुतचि, अतिकठिणा राक्षसी च ती देवी ॥ ११ ये राग, गुरु म्हणे, 'तें टाक चि वल्कल, न तूं मुली ! नेस. । मत्सुवचन ईस नसो मान्य, असावें चि तुज कुलीनेस.' ॥ न म नीं तात रडविला, कैकेयीहून अन्य ज्या माता । क्षिप्र निघे जनकाचा, स्वकुळ करायासि धन्य, जामाता ॥ १३. ने श्री रामासि रथीं राजाज्ञेनें सुमंत्र वाहून. | आबाळ पौर रडले वल्कलधरसानुजासि पाहून ॥ पौ रा नुराग भारी, निजल्या ठायीं तयांसि सोडून, । त्यांतुनि हळुच निघे प्रभु, वंचितभक्तांसि हात जोडून ॥ अ म रनदीच्या तीरीं प्रभुसि सखा गुह निषादवर विनवी । राम म्हणे, 'तातप्रिय तर्पी, फलतृप्ति यांत बरवि नवी.' ॥ 'भ ज जा प्रभुसि च,' ऐसें म्हणुनि, सुमंत्रासि पाठची मागें । उतरी गुह गंगेतें, प्रभु त्यासि म्हणे, 'रहा पथीं जागे.' ॥ जा य, भरद्वाजातें बंदुनि, तत्कथितवनपर्थे तरुनी । यमुनेसि, चित्रकूटा, मुर्निसह वाल्मीकितें नमन करुनी ॥ आ रा मीं तेंचि वसे लक्ष्मणरचितोर्टेजी सदार सदा । १८ होय मुनिसभा रामा, जैशी ते कीर्ति कवि सदा, रसदा ॥ १९ २२ १. मुहूर्त. २. सवर. ३. फसविलेल्या. ४. बागेत. ५. पर्णशालेत. ७ ८ १४ १६ १७