पान:रामायणे भाग पहिला.pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मोरोपंतकृत यक्षपसखप्रभावें आचार्ये साधु पढविले चवघे. । अवघे सुरगुरु गमती; अमृतरसाची च भूप तो चव घे. ॥ राशि तपाचा गाँधिज भेटे राजा, धनाधिपा शिवसा । ज्या मुनिपुढें रवि तसा होय, जसा पूर्णचंद्रमा दिवसा. ॥ 'मन्मख रक्षाया दे राम सलक्ष्मण' म्हणे असें ऋषि, तें । दुष्कर गणिलें भूपें; द्यावें जल आकुलें कसें तृषितें ? | जगतीश्वरासि न रुचे, रुचलें सुतदान तत्प्रभावज्ञा । रघुकुलहिता वसिष्ठा, कीं न हिता होय सत्प्रभावज्ञा ॥ यजमाना वोधुनि तो विप्रांच्या तनय देववी राजा । v १९ २० २१ २२ २३ की त्या अयश नसावें, म्हणती उचितज्ञ देव वीरा ज्या ॥ जय दे, अस्त्रें शत दे मुनि, मग मारूनि ताटिका चंडी, । सिद्धाश्रमांत राघव मारीचसुबाहुगर्वशिर खंडी. ॥ यजन समाप्त करुनि, गुरुसह जाय प्रभु पुरासि जनकाच्या । मुँनिदारोद्धृति रुचवी मतिस, उँपनिषत् जशीच जन काचा ॥ २४ राहु परार्काचा तो शिवचाप सलील खंडिला रामें । २५ २७ अनुरूपा श्रीसीता वरिली, जैशी रति प्रिया कामें ॥ मंहितगुण लक्ष्मण वरी जनकाची उर्मिळाभिधा कन्या । भरतासि मांडवी, श्रुतकीर्ति रिपुनासि पाणि दे धन्या. ॥ २६ श्रीदसमानसभाग्य क्षितिपति दशरथ मयूरसा हर्षे । जनकमहाराजमणी स्वर्णप्रेमाश्रु मेघसा वर्षे. ॥ राहुनि, विवाह करवुनि, सर्वांस पुसूनि, गाधिसुत गेला. । त्यावरि महा अनुग्रह, आग्रह करुनी, स्वयें असा केला. ॥ मनुजेश्वर दशरथ मग, जनकास पुसोनि, दारसुतसहित । मिथिलापुरीहुनि निघे, जो या विश्वांत शकसा महित ॥ जगदीश्वरपितृत्वें बहु मानी सुरसभा जनकराजा । २८ २९ पात्र दशरथा करि त्या नुतिस, सुधासुरसभाजन करा ज्या ॥ ३० यतिमति, विरक्त, परि तो जनक प्राकृत तसा बराचि रडे. । श्वशुरा सुता निरवितां, बहु वाहुनि दुःखगिरिभरा, चिरडे. ॥ ३१ १. कुबेराचा मित्र शिव याच्या सारखा बुद्धिप्रभाव ज्याचा. २. बृहस्पति ३. विश्वामित्र. ४. कुबेराला ५. सज्जनांचे प्रभेचा अपमान. ६. अहल्यांद्वार. ७. 'उपनिषत्'शब्द संस्कृतांत स्त्रीलिंगी आहे. ८. शत्रुरूपी सूर्याचा. ९. मदनानें १०. पूज्य,