पान:रामायणे भाग पहिला.pdf/२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४. बालमंत्ररामायण. जन्या अक्षम आम्ही, त्याच्या नाशा उपाय योजावा; । अनपत्य दशरथ हि कीं याचा जो काय आधि तो जावा.' ॥ यज्ञेशातें ब्रह्मा प्रार्थी, सुयशें जगासि ताराया; । ४ 'देवा ! दशरथसुत हो, दुष्टा दशकंधरासि माराया ॥ रावण, नरकपि न गणुनि, इतरांपासूनि अभयवर याची.' । करिशील हानि युद्धी होउनि तूं श्रीनिवास नर याची.' ॥ मधुमथन 'अवश्य' म्हणे. त्यावरि पुत्रेष्टि ऋष्यशृंग करी । तत्तेजें, मंत्रबळें, नृपभाग्यें, होय कर्मसिद्धि बरी. ॥ जलजाचा बंधु तसा शॅिखिकुंडांतुन निघे पुरुष भव्य । तो हेमपात्र राया दे, पायस ज्यांत अमृतसें नव्य. ॥ यज्वा म्हणे तिघींतें, 'करुनि उचित भाग तें सुपायस खा.' । सदनुग्रह जेंवि तसा कोण करिल इष्ट करसुपाय सखा ? ॥ जगतीपतिच्या भार्या त्या प्राशुनि दिव्य पायसा धाल्या. । कौसल्या कैकेयी ससुमित्रा गर्भिणी तिघी झाल्या. ॥ यम यक्षप शऋ वरुण पवन दहन रवि असे अमर जे, ते । विधिवचनें जैनु अंशें वानरयोनींत जाहले घेते. ॥ राक्षसराजवधार्थी प्रभुला झाले सुखें सुर सहाय । कीं नाहत तो सेवारूप म्हणविल चि मुखें सुरस 'हाय !' ॥ १२ महिषी कौसल्या ज्या शुभ समयीं प्रसवली, तया राम । ऐसें दशरथ ठेवी नाम सविधि, जें सुसिद्धिचें धाम ॥ श्रीसंपन्ना प्रसवे कैकेयी ज्या सुता, तथा नाम । १३ भरत असें ठेवी, सुरतरुपुष्पांचें उणें करी दाम ॥ राकेशमुखी प्रसवे ज्यांसि सुमित्रा, तयां सुतां नामे | लक्ष्मण शत्रुघ्न अशीं ठेवी नृप, पूर्ण होय तो कामें. ॥ मह्यमरांतें अप रत्नालंकार, हेम, गज, वाजी । बालकांड] ५ ६ ७ ८ ९ १० १४ १५ भूप म्हणे, 'बळ दास्या द्या, करतिल पुत्र हे मग जया जी!” ॥ १६ जन्मापासुनि देती निजमूर्तिसमृद्धि साधुरीतीस. । पितरांच्या इतरांच्या प्रीतिस जी कीर्ति माधुरी तीस ॥ १७ १. युद्धास. २. असमर्थ. ३. मनोव्यथा. ४. मागे. ५. अग्नि. ६. कुचेर. ७. जन्म. ८. राणी. ९ पूर्णिमापति (चंद्र.) १०. भूदेव (ब्राह्मण)