पान:रामायणे भाग पहिला.pdf/२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. मंत्रमयरामायण. श्रीराघवा वन, मही निजकायभवासि, दे; दरा न मनीं । धरेिं; जनहृदयजलरुहप्रिय ! धी, राज्य त्यजूनियां, गमनीं ॥ ८ श्रीराज्य यजुनि मही, सानुजभूतनय राघव, मनांत । सुजनांच्या भय नुरवी, स्वभुजद्वयकृतपराक्रम वनांत ॥ श्रीशवियोग वैशमय अजतनयप्राण हरि; नैरामर तो । द्विजशापात्तलय, जसा पिउनि बिलेशयभवा गैरा मरतो. ॥ १० श्री यजि, रौंग धरि मनीं जननीचा, यत्न करि पुरा गमना; । परि जनकयशस्कर, जनहित, नयरत, न मनि सानुराग मना. ११ 'श्रीमुदिराभ, मनोहर, जेंटिल, सुभगकाय, रात्रिचरम में । भेदी; जय पावे; द्विज यति निववि, पैरामया हरुनि, शमें ॥ १२ श्रीगोदातीराश्रम विभु, जप तप यज्ञ करि, परा मथिता; । शूर्पनखातेजःक्षय, जयशाली, राक्षसां मरण कथिता ॥ 'श्रीस हरि रावण मदें, जपुनि यतिमिपें, वरावया मरण; । जरि अनय कळे, करि जन, धरि नच भय, वधि खरा, मदचि न रण. श्रीवर, राक्षस मथितां, जटायुला तोय दे, खरा महित । जनकप्रियसख गृध्रहि; जग गाय, तरीच, सदभिराम हित ॥१५ श्रीश सुरात्युत्तम, जरि यज्ञभुगीश्वरहरादिमत, न बरी. । तरि भजनप्रिय जन, हा स्त्राशय कथि राम, उद्धरुनि शबरी ॥१६ 'श्रीदाराहर मर्दुनि, सुगळ जगीं करि यशोवरामत्र. । जैनिलयजभयमहोष्णीं होय धैराजासुरमण सुच्छत्र. ॥ श्री खचराधिप मेरुदात्मज शोधुनि होय मौवरा मत हा; । जपुनि यथावळ भजतां, यश येचि; म्हणे न राजमणि नत हा. १८ श्रीदसख पुरार्ति मना, तेविं करी जय करावया स्वमनः । जनितरय, जलधिकृतभय, सेतु रची दुस्तराघसंशमन ॥ १९ १. आपल्या पुत्रास. (भरतास.) २. लक्ष्मणसीतेसह. ३. सीतेचा पति जो राम याचा वियोग. ४. दारुणरोग. ५. दशरथाचे प्राण. ६. नरदेव. (राजा.) ७. द्विजशापानें प्राप्त मरण ज्याला. ८. सर्पा- पासून झालेल्या. ९. विवास. १०. क्रोध. ११. शोभायमान जो मेघ यासारखा. १२. जटाधारी. १३. महारोगाला. १४. सुखें. १५. जानकीस. १६. पूज्य. १७. लक्ष्मीरूपिणी जी स्त्री (सीता) हरण करणारा. (रावण.) १८. यश व वर यांचे पात्र म्ह० स्थान. १९. जन्ममरणभयरूप महा उष्णांत. २०. सीताप्राणवल्लभ. (राम.) २१. वायुपुत्र. (मारुति.) २२. लक्ष्मीपतीला. २३. मान्य. २४. कुबेराचा मित्र (शिव.) २५ तरण्यास कठीण जें पाप त्यातें शमविणारा. ३