पान:रामायणे भाग पहिला.pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मोरोपंतकृत १२८ राष्ट्रचि न, राम निववी, देउनि धर्मार्थकाममोक्ष, मही. । मत अनुसरे प्रजांचें अक्षमसा, रामराज तो क्षमही. ॥ राजा राम दयाघन, भक्त मयूरासि, हा, अमृतवर्षे । मन निववुनि, नाचवि जो, भवभान उरों न दे किमपि हर्षे ॥ १२९ ३. मंत्रमयरामायण. (गीतिवृत्त.) श्रीमान् राजशिरोमणि दशरथ, जो निजयरों बरा महित, । द्विजसेवक, यज्ञनिरत, जनभयहर्ता, घरानिकामहित ॥ श्रीशहरा बहुमत तो, त्याच्या प्रांजलयशस्करा महिला । जननी, यज्ञजपाथसपानें, करि; दे सुखा बरा महिला ॥ श्रीराम ज्येष्ठ तनुज, भरत यशोनिधि खरा, कुमारभणी | १ २ लक्ष्मण, शत्रुघ्न जया नयजयरुचि, जशि हरा उमा रमणी. ॥ ३ श्रीराम प्रभु, गाँधिजयज्ञावन, राक्षसांसि मथुनि, करी । ४ ५ मुनि जय जय म्हणती, जैं गौतमैदारामहाघराशि हरी ॥ 'श्रीगलशरासन मथुनि, जय करुनि, धरामनोव्यथा हरिली. । जनकयजनायतनजा, राजसभामद हरूनियां वरिली. ॥ श्रीकंठशिष्य रॉम, द्विजसत्तम, अतियशा, खेळविरामः । त्याच्या जंगतीपाळक्षत्रियजनलयमदा पळवि राम ॥ श्री रामा मग देतां अँजतनय नराधिनाथ; वैमिगती, । घे निजवरद्वय बळें, कैकेयी, खैजननयपरातमती. ॥ ६ ७ १. असमर्थासारखा २. संसारस्मृति ३. यांत प्रत्येक गीतींत 'श्रीराम जयराम जयजयराम' हा त्रयोदशाक्षरी मंत्र साधिला आहे म्हणून यास 'मंत्रमयरामायण' असे नांव दिलें आहे. ४. पूज्य. ५. यज्ञाविषयीं तत्पर. ६. पृथ्वीला अत्यंत कल्याणरूप असा. ७. विष्णु- शिवांला ८. दशरथ ९. शुद्धयशकारक. १०. स्त्रिया ११ पुत्रप्रसवत्या. १२. कुमारांमध्ये श्रेष्ठ. १३. विश्वामित्राच्या यज्ञाचें रक्षण १४. गौतमऋषीची स्त्री जी अहल्या तिच्या महत्पापाचा राशि. १५. शिवधनुष्य. १६. जनकाच्या यज्ञस्थानापासून झालेली. (सीता.) १७. भार्गवराम. १८. दुष्टांचा नाशकर्ता. १९. पृथ्वीपालक जे क्षत्रिय त्यांचा नाश करण्याबद्दल झालेल्या गर्याला २०. राज्यश्री. २.१. दशरथ. २२. कुटिलबुद्धि. २३. वजनाच्या (दशरथाच्या) नीतीनें परमदुःखित मती जीची.