पान:रामायणे भाग पहिला.pdf/२१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२०६ . मोरोपंतकृत रामाचें रचिलं चरित्र मुनिनें वाल्मीकिने संस्कृतीं, । नाहीं हानि कदापि अन्य कविहीं तें वर्णितां प्राकृतीं; । मुक्तांचा रचिलाचि हार वहिला जो रेशिमाच्या गुणें ॥ तो कार्पासगुणेकरूनि करितां काय प्रभेला उणें? ॥ केलें पात्र सुवर्णाचें, की विरूपशि खापरी; । लावितां तेथ संहारी, तैम दीपशिखा परी ॥ (गीति.) खळ निंदिति म्हणुनि बुधे, टाकावी काय हरिगुणासक्ती; । दीरनणंदाजाचें, साध्वी न त्यागिती सुपतिभक्ती ॥ (श्लोक.) श्रीवाल्मीकिप्रभृति मुनिहीं वर्णिली रामलीला; मादृक्षांहीं मुदितहृदयें काय गावें न तीला ? | श्रीकंठेंद्राद्यमरपरिपत्सेव्यगंगाप्रवाह संध्यास्नानादिक न करणें काय या मानवांहीं ॥ अलंकारें युक्ता रघुपतिकथा शोभत असे, अलंकारें हीना जरि म्हणति कोणी न बिलसे; । कृताभ्यंगस्नाना कनकमणिभूपाविरहिता विराजे सिंदूरें धवलवसनें भूपवनिता ॥ सच्चेतः करवातें विच करि, जगत्ताप संपूर्ण टाळी, अज्ञानध्वांत सारें हरि, रसिकचकोरासि अत्यंत पाळी; । नानावस्तु प्रकाशी, कविहृदयपयोराशिसंतोष हेतु, काव्येंदु स्वप्रभेनें खळविरहिजनीं होतसे धूमकेतु ॥ विशुद्धस्त्रांताला रुचति गुण पीयूषसम जे, परी त्यातें दुष्ट स्त्रमनिं विप ऐसेंचि समजे; । 'घृतं क्षीरें होती प्रमुदित भैखीं निर्जर खरे, परी तेही तापप्रद रस जयाला ज्वर भरे ॥ ३ ४ ५ ७ १. कापसाच्या सुतानें २ अंधकार, ३. माझ्यासारख्यांनी ४. शिवइंद्रादिदेवसभासेव्य गंगो- दकांत. ५. साधुचितरूप चंद्रविकासिकमलातें. ६. विकसित ७. अज्ञानांधकार, ८. कविय- समुद्रानंदकारक. ९ काव्यरूप चंद्र. १० शुद्धचित्ता. ११. अमृततुल्य १२. तुपानें १३. दुधानें. १४ यज्ञ १५. देव