पान:रामायणे भाग पहिला.pdf/२१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

उपसंहार] ९ मंत्ररामायण. झाले जे तृप्त भास्वत्कुलतिलकरघूत्तंसलीलारसानें, सारासारज्ञ साधु स्वमनि अमृतही मानिती फार सानें; । पीयूष सोदरेंदुक्षयहि न हरिला, त्यागिलेंही पित्याला, राहूचा घात केला विषसहर्जनिला कोण सेवील त्याला ? ॥ गीर्वाणें राघवाचें यश रसिकजना लागतें फार मिट, न तैसें न प्राकृतानें अचतुर म्हणती, मानिती ते न शिष्ट; । पीतां 'गोक्षीर कार्तस्वरमणिचपकें देतसे जेंवि गोडी; सारज्ञाला पैलाशद्रुमदलपुटकें सेवितां ते न सोडी. ॥ जसे होती देव प्रमुदित शचीनायकवनीं, तसे सौरज्ञाते बुधजन मयूरेशकवनीं; । महाराष्ट्रग्रंथी रसिक कवि जे तेच रमती, परंतु ज्ञात्याची पळहि न असावी चैर मती. ॥ माजी संस्कृति दूषिली जरि खळें उच्छृंखळें आग्रहें, सेवावीच परंतु नित्य रसिकें हे सद्गुणाच्या गृहें; | चंडाळ त्रिदंशापगेत वैमैला की धेनुला स्पर्शला, त्यांचें *'श्रोत्रियदेवसेव्य पैयँही, त्याही सदा निर्मला ॥ २०७ ११ १२ १३ १. सूर्यकुलतिलकरामकथारसें. २. याज्यात्याज्यविवेकज्ञ. ३. लहान. ४. अमृतें. ५. स्वबांधव जो चंद्र त्याचा क्षय, जरी अमृत चंद्रापाशीं आहे, तरी या अमृतानें चंद्राचा होणारा क्षय दूर केला नाहीं. ६. समुद्राला सागराच्या पाग्यांत आतां अमृतगुण राहिला नाहीं. ७. मोहिनीरूप धारण करून वि ष्णूनें दानवांपासून अमृत आणून देवांस प्राशनास दिलें. तेव्हां राहूनें देवरूप धरून अमृतपान केलें. तें त्याच्या कंठगत होत आहे इतक्यांत चंद्रसूर्याच्या खुणेंवरून विष्णूने आपल्या चक्रानें राहूचें शिर छेदिलें, असा अमृताच्या योगें राहूचा घात झाला. (महाभारत, आदिपर्व, अध्याय १९ श्रो०४-६.) ८. जन्म. ९. मूर्ख. १०. गाईचें दूध. ११. सुवर्णाचा रत्नखचित पेला त्यानें. १२. पळसाच्या पा नाच्या द्रोणे. १३. गोडी. १४. इंद्राच्या बागेत. १५. सार जाणणारे. १६. मोरोपंताच्या काव्यांत. १७. चंचल, १८. उत्तमकाव्यकृति १९ गंगेत २० ओकला. २१. अग्निहोत्री व देव यांस मान्य. २२. दूध, पाणोहि.