पान:रामायणे भाग पहिला.pdf/२०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२०२ मोरोपंतकृत 'वद रे ! तैवाग्र जन्मा कोठें? मी पातलों पहायाला' । ऐसें पुसोनि घडवी रंघुनाथाज्ञाविलोप हा याला ॥ ३८७ सौमित्रि म्हणे, 'काय स्वामी ! आज्ञा असे मला कळवा; । एकांती नृप आहे, अवकाश दिजे दैयानिधे !पळ वॉ'. ३८८ रागें विप्र म्हणे, 'रे! भला भला अनया ! । ऐसें परिसुनि कोठेंही वारण दुर्वासा आला हैं, जाणुनि मातें म्हणेल काय न या ? ३८९ मज नाहीं घडलें, परंतु तूं केलें; । भाग्यमदानें तुमचें ज्ञान मला वाटतें लया गेलें ॥ ३९० हेरिहर इंद्र श्रीद ब्रह्मार्कय मेंदुवन्हिमुख मातें । प्रत्युद्गमनें पूजिति, हें श्रुत नाहींच काय रामातें ? ॥ ३९१ तैरणिकुळींचे राजे दशरथपर्यंत देखिले सारे; । परि हा दुर्नय कोटें नव्हता, तो जोडिलात कैसा रे? ॥ ३९२ मार्गी गमनें श्र मलों, आलों भेटावया स्वयें, पर तो । राघव दर्शन नेधे, म्हणतो, 'कां पातलां वृथा? परतो'. ॥३९३ आला दुर्वासा द्विज, हें सत्वर सांग जा, उभा आहें; | किंवा तपसकोपञ्चलनाचें 'वीर्य लक्ष्मणा! पाहें.' ॥ ३९४ ऐसें ऐकुनि 'नॅय पटु सौमित्रि म्हणे मनीं, 'स्वनाश घडो; । परि मुनिकोपाग्निमुखीं शलभासम सर्व लोक हा न पडो. ३९५ वंदुनि कोपर्षं राला, गेला रामासमीप सद्वृत्त | द्वारींचें नृपतीचें सांगे अत्यंत शीघ्र तो वृर्त्त. ॥ ३९६ कृतकार्य काल म गतो गेला रामाचिया पदीं नमुनी; । प्रभुनें समर्चिला बहु दुर्वासा सैत्तपोनदीन मुनी ॥ ३९७ विप्र म्हणे, 'मी तुज ला आलों स्नेहेंकरोनि देखाया; । . देशशत वर्षे तैपैलों, क्षुधित असें दिव्य अन्न दे खाया.' ॥ ३९८ १. तुझा ज्येष्ठ बंधु. (राम.) २. रामाज्ञेचें उल्लंघन. ३. कृपासागरा. ४. अथवा. ५. नीतिहीना, ६. अटकाव, प्रतिबंध. ७. संपत्तीच्या गर्वानें. ८. नाशा. ९. विष्णुशिवेंद्र कुबेर ब्रह्मदेवसूर्यथ्मचंद्रा- म्न्यादि. १०. सामोरें येणें. ११. सूर्यवंशाचे १२. तपस्वीक्रोधाग्निचें. १३. बल, सामर्थ्य, १४. नीतिज्ञ, १५. पतंगतुल्य १६. रागिट (दुर्वास) त्याला. १७. सुंदर वागणें ज्याचें. १८. वर्तमान, १९. मफलेच्छ. २०. पूजिया. २१. सुतप:समुद्र. २२ हजार वर्षे. २३. तप केलें.