पान:रामायणे भाग पहिला.pdf/२००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९४ मोरोपंतकृत ॥ २९६ क्षितिजेचे तेनु ज तदा जावुनियां प्रोक्षिले स्वकीय करें । बालग्रहोपशांतिप्रज्ञाबलकीर्तिशांतिशातकरें. जो प्रथम तैन य मुनिनें मंत्रजलें प्रोक्षिला कुशाग्रांहीं । तो कुश, कुंशमूलोक्षित लव जाणावें असें समग्रांहीं.२९७ हें परिसुनियां रात्रौ पावे शत्रुघ्न हर्ष अतिमात्र; । पात्र सुखाचा झाला, सात्विक भावाष्टकैकहृतगात्र ॥ २९८ वाल्मीकिपादक म के प्रातःकाळी नमूनि यमुनेला, । गेला शत्रुघ्न बळी, जेथें लवणें क्षयासि जन नेला. ॥ २९९ सारी सेना तेव्हां श्री भानुसुतेचिया तटीं स्थापी; । राघव विप्रांसि म्हणे, 'मारावा केधवां महापापी ? ॥ ३०० मुनि म्हणती, 'वीरा! तूं आधीं धाडोनियां भले चार, । शूलरहितलवणाचा या स्थानीं आणवीं समाचार ॥ ३०१ मग जावुनियां म दीं, नाहींतरि यासि जिंकितां धाता, । जय पावेना, याणें पूर्वी वधिला समर्थ मांधाता.' ॥ ३०२ त्या शत्रुघ्नेंद्विज ज नवचनें जे शीघ्र धाडिले चार, । ते कथिती ‘शूलरहित गेला मृगयार्थ' हा समाचार || ३०३ १. सीतेचे पुत्र. २. त्यांच्यावर उदक सेचन केलें. ३. बालग्रहशांति, बुद्धि, बल, कीति, शांति, सुख करणारा. (‘करें' या शब्दाचें विशेषण.) वालग्रह म्ह० मुलाला उपद्रव करणारे ग्रह; या ग्रहांत स्कंदग्रह मोठा प्रवल असून शकुनी, रेवती, पूतना, अन्धपूतना इत्यादि त्याचा परिवार होय असें वर्णन आढळतें. बालग्रहांची नांवें 'भावप्रकाश' नामक वैद्यकग्रंथांत आहेत तीं- 'स्कंदग्रहस्तु प्रथ म: स्कंदापस्मार एवच । शकुनी रेवती चैव पूतना गन्धपूतना ॥ पूतना शीतपूर्वा च तथैव मुखम- ण्डिका पञ्चमी नैगमेयश्च प्रोक्ता बालग्रहा अमी ॥ बालग्रहा अनाचारापीडयन्ति शिशुं यतः । त स्मात्तदुपसर्गेभ्यो रक्षेद्वालं प्रयत्नतः ॥' (शात= सुख, आनंद.) ४. दर्भाच्या अग्रांनीं. ५. दर्भाच्या मूळांनी सिंचन केलेला. ६. अतिशय ७. सात्विक आठ भावांपैकी प्रत्येकानें ज्याचें एक एक गात्र हरण केलें असा. (शत्रुघ्न.) स्तंभ, प्रलय, रोमांच, स्वेद, वैवर्ण्य, अश्रुपात, वेपथु आणि वैश्वर्य हे सात्विक आठ भाव. यांनी शत्रुघ्नाचीं आठ अंगें व्यापून टाकिली, असा भाव. ८. यमुनेच्या ९. शत्रुघ्न १०. दूत. ११. ब्रह्मा. १२. हा मांधाता राजा सुरलोकविजयार्थ स्वर्गास गेला. तेव्हां इंद्रानें 'लवणासुरास जिंकून मग मजकडे ये' असें त्यास सांगितलें. त्यावरून हा परत येऊन ससैन्य लवणासुरावर चालून गेला. यानें रुद्रदन शूल टाकतांच, मांधाता गचें सैन्य दग्ध झालें व तोही तत्काळ मरण पावला. १३. शिकारीस