पान:रामायणे भाग पहिला.pdf/१९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९२ मोरोपंतकृत है परिसुनियां श्री म द्राम म्हणे, 'दंड हा कसा यास ? | वस्त्रे वेष्टा म्हणसी जो योग्यचि रेज्जुनें कैसायास.' ॥ २७४ भैषण म्हणे, 'श्री रामा ! होता धर्माधिकार मजला हो; । येणें श्वयोनि घडली, अविवेकी हा असीच गति लाहो.' ॥ हा सारमेय सं म त दंड येतीतें रघूत्तमें केला; । यावरि गृधहृतालय घूंकहि रघुनायकाकडे गेला. ॥ २७६ गृध्र म्हणे, 'मनु ज पते! मद्गेहातें उलूक हा हरितो.' । धूक म्हणे, 'माझें गृह. अन्यायचि गृध्र सर्वथा करितो. २७७ ऐसें ऐकुनि 'नय पटु राम म्हणे, 'लागला कधीं दावा ? । केव्हांपासुनि तुमचा गेहेव्यवहार तो निवेदावा.' ॥ २७८ गृध्र म्हणे, 'रघु रा या ! झाली मैनुजावृता जधीं अवनी; । तेव्हांपासुनि आहे भवनी, आतां समर्थ अवनीं ॥२७९ 'जेव्हां क्षिति वृक्ष म यी तेव्हां पासूनि नांदलों भवनीं । भवनिर्दलना ! रक्षी, घूक म्हणे, 'तूं नयज्ञ या भुवनीं. २८० राम म्हणे, 'मनु ज मग, प्रथम द्रुम गृध, चोर घूक खरा.' । तेव्हां कविनीं स्तविली कौसल्यासूनुची मति प्रखरा.॥२८१ करुनि पैशल य हृतिमिष रघुनाथाच्या करांबुजस्पर्शे । गौतमशापापासुनि सुटला तो ब्रह्मदत्त नृप हर्षे ॥ २८२ यमुनावासी द्वि ज जन आला रामासि दुःख सांगाया; । पूजुनि त्यासि म्हणे विभु, 'कळवा जी ! कोण हेतु भागाया.?" 'मुनि म्हणती भय हरिलें सर्वांचें तूं, परंतु याकाळीं । मैथुनंदन लवणासुर मारुनि, रामा ! द्विजोतिजन पाळीं ॥ १. दोरीनें. २ बांधण्यास. ३. कुत्रा. ४. कुत्र्याचें जन्म. ५. कुत्र्यास मान्य असा. ६. सं- न्याशातें. ७. गीधं हरिलें गृह ज्योंच असा. ८. घुबडहि. ९. सारमेयाख्यान आणि गृध्रोलूका- ख्यान हीं ५९ व्या सर्गापुढील तीन प्रक्षिप्त सर्गात आहेत. १०. गीध. ११. नीतिकुशल. १२. गृहांत राहणें. १३. मनुष्यव्याप्ता. १४. पृथ्वी १५. गृहीं. १६. रक्षणी. १७. संसारनाशका हे रामा, १८. रामाची. १९. तीव्रा. २०. परगृहहरणनिमित्त. २१. कालगौतम मुनीच्या शापानें गृध्रयोनि पावलेला एक प्राचीन राजा. (प्रक्षिप्त सर्ग ३ श्रो० ५६) २२. यमनातीरस्थ. ( स० ६०-६३) २३. मधुपुत्र. २४. हा मधुदैत्यापासून कुंभीनसीस झालेला पुत्र. २५. ब्राह्मण.