पान:रामायणे भाग पहिला.pdf/१९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

उत्तरकांड ] मंत्ररामायण. पहिला नॄगाख्य राजा होता, जो दानशौंड जनमान्य; । ऐसा भूपति कोणी पूर्वी सूर्यान्चयांत न वैदान्य ॥ २६२ "गोदानें अत्युत्त म दिधलीं ज्याणें असंख्य विप्रकरीं; । जो लाजविता झाला तारापतिला यशश्छविप्रकरीं ॥ २६३ प्रथम दिली द्वि ज हस्तीं ते सुरभी ये पळोनि कळपाला; । नेणुनि परासि देतां, शापी भूदेव भूमिपाळाला. ॥ २६४ शापानें नैरना य क झाला तो घोररूप कलास; । म्हणउनि सावध वर्ता, ऐसें कथितो हितार्थ सकलांस.२६५ गुरुसुरविप्रा रा धन करितां बहु सावधान आचरणें,' । ऐसें कथिलें रामें हरिला जनदोष ज्याचिया चरणें ॥२६६ त्यावरि एका स म यीं भग्नशिरा सौरमेय रामातें । येवुनि म्हणे, ‘यतीनें दोषावांचूनि दंडिलें मातें.' ॥ २६७ धाडुनि सेवक ज न तो संन्यासी आणिला कृपाळानें; । पुशिले वृत्त समस्त प्राणिप्राणक्षमें नृपाळानें ॥ २६८ 'मार्गीत सारमेय स्पर्शेल म्हणोनि वारिला परता; । पर तोडिल्याविणें हा, दूर न झाला विभो ! अँपापरता ! ॥ यास्तव रामा ! मज ला आला कोप क्षणांत ऊदंड; । क्षुधितें भिक्षान्नघरें केला "दंडें करूनियां दंडें ॥ २७० शांतिक्षमादया यमनियमें `यॆतिनें सदैव वागावें; | परि दैवें अँघ घडलें, तें तुज रामा ! यथार्थ सांगावें.२७१ शासन मला करा या धर्मज्ञा ! योग्यता तुला आहे.' । ऐसें तो यति वदतां, कुंकुरवदनाकडे प्रभू पाहे ॥ २७२ तेव्हां तोश्वाक्रोधें म नुजेंद्राला म्हणे, 'अशा यतिला । सांगावा धर्मज्ञा ! राया ! धर्माधिकार दुर्मतिला.' ॥ २७३ १. नृगनामक (उत्तरकांड सर्ग ५३-५४ पहा.) २. दात्यांमध्यें श्रेष्ठ. ३. सूर्यवंशीं. ४. उदार. ५. गाईची दानें. ६. चंद्राला. ७. कीर्तिकांतिसमूही. ८. गाय. ९. ब्राह्मण १०. सरडा. ११. आचरण करा. १२. डोकें फुटलेला. १३. कुत्रा. १४. प्राण्यांना प्राण देण्यास समर्थ अशा (रामानें.) १५. रा. १६. परंतु. १७. हे पापरहिता (रामा.) १८. पुष्कळ १९. काठीनें. २०. शासन. २१. शांति, सहन करणें, दीनावर दया, इंद्रियनिग्रह या नियमांहीं. २२. संन्याशानें. २३. पाप. २४. कुत्र्याच्या मुखाकडे, १९१