पान:रामायणे भाग पहिला.pdf/१८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७८ मोरोपंतकृत बलितेजोभन श्री रावण चक्रासि ऊचलायाला । बळ करितां पडिला तो, पाहुनि दैत्येंद्रे हांसला याला ॥ 'त्रिजगन्नाथप रा जय कर्तव्याच्या धरूनि कामातें । याच बळें देशवदना ! करणार विमुक्त काय तूं मातें ? ॥ जिंकित होते स म रीं अमरपतीतें करोनियां पण जे । ते ज्या हॅरिनें वधिले लीलालेशेंचि आमचे पैणजे ॥ १२० होता जो मत्पूर्व ज हिरण्यकशिपु प्रसिद्ध नामानें । त्याचें हें कुंडल, जें झालें गुरु तूज मेरुच्या मानें ॥ १२१ नुचले कुंडल य नें ज्याचें, तत्काल मारिशील कसा? । गैंगन स्थविधुग्रहणीं इच्छा धरितोशि काय बालकसा ?' १२२ बलिवाक्यानें सारा रावणगर्व क्षणांतरें शमला; । लंकेसि जावयाला प्रार्थुनियां 'दे' म्हणे 'निदेश' मला.' ॥ दैत्याधीश महा म ति आज्ञा दे रावणासि जायाला; । वैरॅमहिमा रक्षाया द्वारीं न मुरारि भेटला याला ॥ १२४ दिनमणिपरा ज यातें मग जाय देशास्य चंडकोदंडी; । 'क्षुद्रमतीप्रति रविनें ‘जितोऽस्मि’ म्हणवोनि धाडिला दंडी.॥ पर्वत मुनिना य क जो, ज्ञानाचें पीटें ज्यापरी धता । याणे देशकंठाला कथिला राजा समर्थ मांधाता ॥ १२६ मुनिवचनें र ज नीचर युवनाश्वसुतासवें करी समर; । तेव्हां जय कोणातें घडेल हें नेणती स्वयें अमर ॥ १२७ य त्वें वारिति येवूनि शीघ्र दोघांस; । म्हणती, 'तुमच्या मरणें निजजन शोकाग्निचा न हो घाँस.' ॥ गौलव पुलस्य १. बलितेजें निस्तेज असा. २. बली. ३. विष्णुपराजय करण्याच्या. ४. इच्छेतें. ५. हे रावणा, ६. इंद्रातें. ७. प्रतिज्ञा. ८. विष्णूनें. ९. सहजचि १०. हिरण्याक्ष व हिरण्यकशिपु. ११. जड. १२. विष्णु. १३. आकाशांतील चंद्रग्रहणी. १४. आज्ञा १५ वरसामर्थ्य ब्रह्मदेवाने दिलेला वर खंडित न व्हावा म्हणून विष्णु अंतर्धान पावला, बलीच्या द्वारी मुसळधारी विष्णुरूपी पुरुष द्वार पालक होता अशी कथा आहे. १६. विष्णु. रावण बलिराजाला सोडविण्यासाठी गेला होता. ही कथा उत्तरकांडाच्या प्रक्षिप्त सर्गात आहे. १७. सूर्यपराभवातें. १८. भयंकर धनु ज्याचें असा. १९. जिंकिला आहे (मी). २०. नामविशेष. सूर्याचा द्वारपालक. २१. ऋषिश्रेष्ठ २२. स्थान. २३. ब्रह्मा. २४.इक्ष्वाकुकुलोत्पन्न युवनाश्वराजाचा पुत्र, अयोध्याधिपति २५. युवनाश्रनामक राजाचा पुत्र जो मांधाता त्यासवें. २६. ऋषिविशेष. २७. आहुति.