पान:रामायणे भाग पहिला.pdf/१८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७४ मोरोपंतकृत शिवचरण द्वय वंदुनि तुहिननगीं जाय पुष्पकारूढ; । ७७ तेथें तैपस्विनीतें, पाहुनि झाला स्मरार्त तो मूढ. ॥ ७६ वृत्त तिचें असु रा धिप, पुसतां मग त्यास ते म्हणे युवती । 'मी गुरुपुत्र कुशध्वजकन्या नामें करूनि वेदवती ॥ वेदोच्चारणस मयों झाल्यें मी वाङ्मयी प्रभावानें; । विष्णुप्रात्यर्थ वनीं, तप करित्यें नित्य शुद्ध भावानें ॥७८ मँज्जनकमनीं श्री पतिहस्ती द्यावी सुता असें होतें; । दैत्येंद्रे शंभूनें वधितां तांतासि, राहिलें हो तें. ॥ ७९ हरिहुनि दुस रा वर मज न रुचे, म्हणवूनि हें सदाचरण; । निजैजनकल्पतरूचे चित्तीं मी पूजियें सदा चरण.' ॥ ८० श्रवण करुनि में दनातुर रावण तीतें म्हणे, 'अहो ! जाये ! । मजदुनि काय अधिक हरि ? होवुनि पत्नी गृहासि माजा ये.'॥ यापरि खल '३ ज नीचर वदतां, पावे अॅनल्प धिक्कार; । वेदवतीकेशातें धरुनि करी दुष्ट तो बलात्कार ॥ ८२ अलकांचा संच य ती करकरवालेंचि तत्क्षणी छेदी; । १९ सुकृतक्षयभय झालें, म्हणवुनियां शापदानही नेदी ॥ ८३ मग ते निशच रा ला 'बधीन जन्मांतरीं तुला ! हो मी;' । ऐसें वदोनि तैनुला त्यासमयीं दीप्तेपावकीं होमी. ॥ ८४ वेदवती ते कमलीं जन्मे तों तीस दुष्ट तो पाहे; । मग दशवदनें नेली लंकेला वेदगर्भरूपा हे. ॥ रावणमंत्री ति ज ला अवलोकुनियां म्हणे, 'अहो खामी ! । टाकावी हे कन्या, न वसावी सर्वथा तुझ्या धाँमी.' ॥ ८६ १. हिमाचळीं. २. तप करणारी स्त्री तीतें. ३. कामपीडित. ४. स्त्री. ५. बृहस्पतीचा पुत्र जो कुशध्वज नांवाचा ऋषि त्याची कन्या. ६. वाणीरूप. ७. माझ्या बापाच्या मनीं. ८. विष्णुहस्तीं. ९. दैलेश्वर शंभुनामा साणें. १०. बापाला, कुशध्वजाला, शंभु नामक असुरानें हिला तिच्या बापाजवळ मागितलें तेव्हां त्याने तिला दिली नाहीं, म्हणून असुराने तिच्या बापास रात्रीं निजलेला असतां मारून पलायन केलें. (उतरकांड, स० १७ श्रो० १२-१३.) ११. स्वभक्तकल्पवृक्षाचे. १२. कामानुर. १३, रावण. १४. बहु. १५. केशांचा. १६. समूह. १७. हस्तरूप तलवारीनें. १८. शाप दिला असतां पुण्याचा नाश होईल असें भय. १९. न देई. २०. राक्षसाला. २१. देहाला. २२. पेटलेल्या अग्नींत. २३. गीति ८५-८७ यांस वाल्मीकिकृत रामायणांत आधार दिसत नाहीं. २४. वेदोत्पन्न २५. गृहीं.