पान:रामायणे भाग पहिला.pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मोरोपंतकृत राजी सलक्ष्मण प्रभुवर विशिखांच्या कबंधलक्षांचें। मन मोहाया दाविति नृत्य शतमखादियुद्धदक्षांचें ॥ रावणभंगे, पावे जो सेनेश प्रहस्त, तो मेला. । मरतां राक्षसकटकें, मायावी मेधैरव न कोमेला ॥ रावणि अहिपाशांहीं सौमित्रिस रघुवरासही बांधी। मर्कटकटकें भंगी. श्रीची होईल न विकळा कां धी? ॥ राजा सर्वखगांचा धांवुनि ये, सख्य संकटीं कळवी; । मरुदशनांतें प्रभुच्या, गुरु दोषांतें जसा, तसा पळवी. ॥ रावण घटकर्णातें, कष्टें उठवुनि, रिपुक्षया धाडी । मदिरामदांध तो, बहु कपिवीरांतें, रणांगणीं, पाडी ॥ रात्रिंचरेश्वरानुज सुप्रीवातें रणीं धरी, परते; । मर्कटकटकें भ्यालीं; विजयें घनसेचि गर्जले पैर ते ॥ राजा मग, सुटुनि, हरी घटकर्णघ्राणकर्ण वेगानें । महती ख्याति करी, सुरगंधर्वोसहि न वर्णवे गानें ॥ रागें भरे, फिरे, तो काळ गमे, कपि वधी, गिळी सगळे । मर्कट भयें गळाले; पर्वतशतवृष्टिनेंहि तो न गळे. ॥ राम प्रभु भुज चरण च्छेदी, तरि तो न आवरे अहित । मस्तक खंडुनि पाडी; त्यातें करि वीरमंडळी मेहित. ॥ राक्षसराजाचे जे बंधु, मुत, सचिव, सहाय, ते सर्व, । मंठ कपटाचे, खचले, दाखविते वज्रपाणिला गर्व. ॥ रावण, त्यांच्या शोकीं, जें जें श्रुत सदनुजोक्त, आठवि तें । मसगाप्रति सल्लंघन स्वकुळाहि, महाबळाहि, पाठवितें ॥ रावणि धैर्य तया दे, गगनांत शिरोनि, शस्त्रदृष्टि करी । मति मोहीं सर्वोची बुडवी, प्रभुही दशा तशीच वरी ॥ राजीवभवसुताची हृदयांत धरुनि यशःप्रदा वाणी, । ७८ ७९ ८० ८२ ८३ ८४ ८५ ८८ १. शतमखादि म्ह० इंद्रादियुद्धदक्षांचें मन मोहाया, सलक्ष्मण प्रभुवर विशिखांच्या म्ह० बा- णांच्या राजी म्ह० पंति [आणि] कबंध म्ह० शिररहित जी धडें त्यांच्या लक्षांचें नृत्य दाविती, असा अन्वय २. इंद्रजित्. ३. सतें. ४. कुंभकर्णातें. ५. राक्षसराजाचा अनुज ( कुंभकर्ण.) ६. शत्रु. ७. सुग्रीव ८. मोठी. ९. पूज्य. १०. रावणाचे. ११. गृहें. १२. इंद्राला. १३. साधु विभीषणाचें भाषण. १४. साधूंचा अपमान १५. ब्रह्मदेवाचा पुत्र ( नारद ) याची.