पान:रामायणे भाग पहिला.pdf/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२. नामांकरामायण. ६८ मकरालयासि पावे शिवविधिशतमखमहर्षिकोटिनुत ॥ राक्षसराजानुजनि, प्रणत, विभीषण, पैलाशकुलराज्य, । मधुपमै जसें कमळी, रामपदीं पावला, यश प्राज्य. ॥ राशि जळाचा प्रभुच्या तेजा भी; विनवि, 'बा ! यश तगावें; । मज दाम अयुतयोजनही सेतु गमेल; काय शत गावें ?? ॥ राक्षसराज, धराया सत्वर कुळसहित मृत्युची पदवी, । मस्तक मैनुष्यपतिचें दावुनि सीतेसि 'ही!' असें वदवी. ॥ रामा बिभीषणाची सरमा, मौया असें तिला कळवी; । मळवी अश्रुभरें जी मुख देवी, तन्मनोव्यथा पळवी. ॥ राहुनि अष्ट दिन तटीं, नळकपिला कथुनि, सेतुतें करवी । मग, सबळ प्रभु उतरे, प्राज्य यशोमृत जगत्रया भरवी. ॥ राजा कपिकटकांचा, प्रभुतें घेउनि, चढे सुवेळनगीं । मत्तीं त्या दुर्गस्थीं उड्डुनि पडे, श्येन जेविं तुच्छखगीं ॥ रागें ताडुनि, पाडुनि शत्रुमुकुट, ये करूनि भुजयुद्ध; । महिजाकांत म्हणे, 'बा! साहस हैं; या न म्हणति बुध शुद्ध' ॥ ७२ ७१ राक्षसपुर विभु रोधी; अंगदवदनें दशानना बोधी; । मैत्सरिवर अरि, परि, हरि करि साम, न आवरीच जड तो धी. ॥ ७३ रात्रिचरचार धरिती, भुज झाडुनि, वाळिसुत करी चूर. । मथुनि प्रासादातें, सूरकुळवरासि तो कथी सूर. || रागिट वानर ऋक्ष, प्रभुची होतां रणार्थ आज्ञा, ते । मलिन निशाचर मथितां, प्रेक्षुनि म्हणती, 'न मात आ' ज्ञाते. ॥ ७५ राहे महामुनीचा नित्यविधि, समाधि; समरयज्ञांत । मन लुब्ध; जय पराजय दिसती, घटिकेंत, सम रेयैज्ञांत ॥ राड रुधिरमांसांची झाली समरांगणीं; मग, नदी न । मैंत्तेभांहि तरोंदे; पळति खेचर; काढिती तेंग न दीन. ॥ ७६ ७० ७४ ७७ १. रावणानुज २. राक्षसांच्या कुलाचें राज्य. ३. भ्रमर. ४. मध. ५. जलाचा समूह. (समुद्र.) ६. भय पावे. ७. माळा, ८, दहा हजार ९. योजनें, १०. राजा रामाचें. ११. हाय. १२. स्त्री. १३. विभीषणखीचें नांव. १४. कपट. १५ तिची (सीतेची) अंतःकरणसंबंधी व्यथा. १६. कीर्तिरूप अमृत. १७. सुवेळनामकपर्वतीं. १८. सीतापति. (राम.) १९. मत्सर करणाऱ्यांमध्ये श्रेठ २०. रावणाचे दूत. २१. राजवाड्यातें, २२. रामचंद्रास. २३. वेगवानांत. २४. गजांही. २५. पक्षी. २६. टिकाव.