पान:रामायणे भाग पहिला.pdf/१७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

उत्तरकांड] मंत्ररामायण. मग मातामहैं रा क्षस सुमालिनामा दशाननास म्हणे, । ‘वर साधिले बरे तरि, घे, लंकास्थान शीघ्र वीरमणे!’॥४५ तेव्हां प्रहस्तना म क दूत दैविणाधिपाकडे प्रेषी; । प्राकृत पैरस्वहरणी सैतृष्ण दिक्तुंड तो जगद्वेषी. ॥ ४६ त्या घटकर्णाग्र ज निर्जेदूतोक्ताचें करूनियां श्रवण । विकृति न धरितां बोले, सौभ्रात्रीं जो संतृष्ण वैश्रवण. ४७ 'मी अग्रज तैन य तसा, तूं मज एका स्थळीं कृतस्नेह । पैवेमानकृष्णवर्मा तसे बसों ये, तुझेंचि हें गेहैं. ॥ ४८ हें दूतमुखें नि ज मत, कळवी अनुजासि, तो प्रकृती । त्या उत्तरेश्वराशीं, इच्छीना स्नेह निर्दयोपकृती. ॥ ४९ तोतास यक्षना य क एकांती हें समस्त आयकवी; । सस्नेहैं भूसुरेश्वर, तें ऐकुनि सूनुला असें शिकवी. ॥ ५० 'हा दुष्ट परम रा क्षस निवारितांही करीतसे दौवाः । दे लंका सोड्डुनियां, त्वां तरि माझा, निदेशे' वंदावा ॥९१ तातनिदेशें तो मग, कुबेर गेला हिमौख्यशैलास । वसवी दुर्गाशंकरचरणाव्जस्पर्शपूत कैलास || तो दशवदन श्री दत्यक्तपुरीमाजि जेधवां बैसला; । त्रिभुवनलोक मनींही, तेव्हां भययुक्त तापही बसला. ॥ ५३ विष्णुभयद्रुत राक्षस पातालाहूनि याकडे आले; । राज्याभिषेक होतां दशकंठाला, महासुखी झाले. ॥ ५४ ५२ १. आजा. आईचा (कैकसीचा) पिता. २. रावणास ३. कुबेराकडे, ४. क्षुद्र, नीच. ५. परधनहरणीं. ६. इच्छायुक्त. ७. रावण. ८. रावणदूतवाक्याचें. ९. येथें 'निज' या शब्दाचें वारस्य दिसत नाहीं. १०. कोप. ११. उत्तमबंधुत्वाविषयीं १२. वडील बंधु. १३. पुत्र. १४. स्नेहबद्ध १५. वायु व अग्नि कृष्णवर्मा म्ह० अग्नि. अग्नीचा मार्ग (वर्मा) दहनक्रियेनें काळा (कृष्ण) होतो, म्हणून हें नांव याला पडले आहे. १६. गृह. १७. दुराग्रहस्वभावी. १८. दयाउप- कारहीन. १९. पिता (विश्रवाऋषि) त्यास. २०. ब्राह्मणश्रेष्ठ. २१. कलह. 'दावा' हा शब्द आरबी आहे. २२. आज्ञा. २३. हिमाचलास. २४. पार्वतीशिवपदकमलस्पर्शे पवित्र असा. २५. कुबेरानें टाकिलेल्या नगरीत. २६. बसला. येथें 'बक्यो: सावर्ण्यम्' या नियमास अनुसरून 'ब'- च्या स्थानीं 'व' योजिला असतां प्रास साधून वर्णव्यत्ययरूप दोषही येत नाहीं. वर्णांच्या सजातीय- त्वाविषयीं नियम आहे तो:-'रलयोर्डलयोश्चैव शषयो वयोस्तथा । वदंत्येषां च सावर्ण्यमलंकारविदो जनाः ॥' २७. तीन जगतांतील जनांच्या मनांत. २८, विष्णुभयें पळालेले.