पान:रामायणे भाग पहिला.pdf/१७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मोरोपंतकृत जन्मा तो बिभीषणाला म्हणे, 'पुरे शांता । पंचसहस्रसमा तप केलें सत्यव्रतस्थिता ! दांता ! ॥ य में केलें संपूर्ण हो नँयप्राज्ञा ! । सूर्या लोकननि माग वरौतें सुमते ! वत्सा! मी देतसें स्वयें आज्ञा.' ॥ ३७ विनवुनि चतु रा स्यातें म्हणे, 'असो हर्ष साधुच्या भजनीं; । दे ब्रह्मास्त्र अशिक्षित सुरेश्वरा ! हाचि मुख्य लाभ जनीं.' त्याला म्हणे पिताम ह, फार बरौं काँमैं हा तुझा सांधो । राक्षस असोनि शुभमति, यास्तव अमरत्वही दिलें सौधो !' || ३९ तदुपरि गेला 'श्री विधि घटकर्णाला वरासि देयातें; । 'दुष्टासि वरसमर्पण, अनुचित' म्हणती अमर्त्य तो यातें. ४ ० मग मुखचिव रा मध्यें घटकर्णाच्या सुरार्थ ते वाणी । शीघ्र पितमहँवाक्यें शिरे गुहेमाजि चंचलेवाणी. ॥ ४१९ घंटकर्णाला के म लज, 'माग' म्हणे 'जें अभीष्ट तें सारें; । अयुताब्दकाल दुःसहैं नियम बरे पाळिले निरौहारें.' ॥४२ देशवदनानु ज तेव्हां व्यामोद भारतीहृतखांत । सर्व सुरेशासि म्हणे, ‘निद्रा दे जाहलों तपःश्रांत.' ॥ ४३ वर देवुनि तो" य जभव जातां संध्यापयोदसमवर्ण । सुरेकृतवंचन जणुनि सोडी निश्वास उष्ण घटकर्ण ॥ ४४ १. ब्रह्मदेव. २. पांचहजार वर्षे. ३. सत्यवतीं रहाणाया. ४. हे जितेंद्रिया. ५. सूर्यावलोकन- नियमानें. ६.हे नीतिज्ञा. ७. हे बुद्धिमंता. ८. हे मोठें भयंकर अस्त्र असून मोठमोठ्या पराक्रमशाली वीरांसच माहीत असे. ९. सदुपदेशाशिवाय अवगत व्हावें असें. १०, इच्छा. ११. सिद्ध होवो. १२. हे साधो. १३. ब्रह्मा १४. कुंभकर्णाला. १५. अयोग्य. १६. देव. १७. देवकार्यार्थ १८. ब्रह्मवचनें. १९. विजेतुल्य. २०. वांछित. २१. दहाहजार वर्षे. २२ भोजनाशिवाय राहून. २३. मोह उत्पन्न करणाऱ्या वाणीनें ज्याचें चित्त हरिलें असा. २४. सायंकाळमेघतुल्यकांति २५. देवकृत मोह. २६. कुंभकर्णाने गोकर्णक्षेत्री उम्र तप केलें म्हणून पितामह त्यास वर देण्यास सिद्ध झाला. तेव्हां यास 'वर माग' असें म्हणावयाचें तें याला आधीं मोहित करून नंतर म्हणावें, अशी देवांनी प्रार्थना केली. मग पितामहानें देवांच्या विनंतीप्रमाणे याच्या जिव्हाग्री सरस्वतीची स्थापना करून यास वर मागण्याची आज्ञा केली. तेव्हां यानें 'निद्रा दे' असा वर मागितला. नंतर सरस्वती निघून गेल्यावर हा शुद्धीवर आला, आणि माझ्या मुखांतून असें वचन कसें निघालें असें म्हणून खिन्न झाला. हा कांहीं भलतेंच मागावयास चुकावयाचा नाहीं अश्या भीतीनें देवांनीं हें कपट केलें. (रामायण, उत्तरकांड, स० १० ओ०३५-४९) १७० मग हैं ३६