पान:रामायणे भाग पहिला.pdf/१६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९६० मोरोपंतकृत भारद्वाजाश्र म हा, जाऊं त्याच्या नमूचि पायास; । आम्हां तिघांसि पाहुनि पूर्वी आली महाकृपा यास.' ॥ ८०० ऐसें वदतां, ज गती पावे संयोग पुष्पयानाशीं; । मग रामशिरोंबुजही मुनिपादाशीं दयानिधानाशीं ॥ ८०१ य मग रामें भरतातें खागमास कळवाया । पवनतन पाठविला दूत पुढे, लोकांचा सर्व शोक पळवाया ॥ तो पवनात्म ज मार्गी सांगोनि गुहासि राम आला हैं; । ८०२ नंदिग्रामीं गेला, मनुजाकृतिला धरूनि लवलाहें. ॥ ८०३ य श्रीमद्रघुनंदनपादुका र्चनाधीन । मँणिहेमम 'मीन जलाविण जैसा, मारुतिनें भरत देखिला दीन. ॥८०४ 'आला राघव राजा, तापापह मेघ तो जसा मोरा; । तत्सेवालाभरता भरता ! ये त्यास आज सामोरा'. ॥ ८०५ ऐसें अमृत म योक्त श्रवणीं पडतां, प्रभंजनात्मजनी । भरतासि भासला तो विधारी महाप्रमोद जनीं ॥ ८०६ आलिंगुनियां श्री मन्मारुतिला 'कांचनासनी अर्ची; । प्रार्धुनि म्हणे, 'कृपाळा ! मालविली शोकवन्हिची अँच.८०७ मैदुःखसाग राचा अगस्त्य तूं; काय बा तुझें नांव ? | चिंतानदर्दीत बुडतां, दैवें कोठोनि धाडिली नाव ? ॥ ८ ० ८ रामचरित्र म यामृत पाजावें त्वां महातृषाक्रांता; । बाळाला स्तंन्य जसें देत्ये माता कृपाकुलस्वांता.' ॥ ८०९ शोध करीत करीत पाताळी आले; तेथें त्यांस तो अश्व कपिलाच्या आश्रमांत आढळला. तेव्हां ते या मुनीस ताडन करूं लागले. रागानें त्यांजकडे पाहतांच ते सर्व जळून भस्मीभूत झाले. त्यांचा उद्धार करण्यासाठीं भगीरथानें गंगेला पाताळांत कपिलाश्रमी नेऊन त्यांस पापमुक्त केलें, असा येथें कथासंबंध आहे. १. पृथ्वी २. पुष्पकविमानाशी. ३. रामशिरकमल. ४. दयाभांडार असा. ५. आपले आगमन. ६. गुह हा किरात रामाचा मित्र होता. राम वनवासास जाऊं लागला, तेव्हां यानें त्याला नावेंतून भागीरथीचे पार करून दिलें. ७. रत्नखचित रामपादुकापूजातत्पर. ८. मासा. ९. तापनाशक १०. रामसेवातत्परा. ११. अमृततुल्य मधुर भाषण १२ मारुति. १३. शरीरधारी १४. मोठा आनंद. १५. सुवर्णाच्या आसनावर १६. पूजी. १७. ज्वाला. १८. माझ्या दुःखसमुद्राचा तूं अगस्त्यमुनिसारखा नाशक. (अगस्त्यमुनीनें कालेयक नामक दैत्यांचा नाश करण्यासाठीं सागरजलाचें शोषण केलें, अशी पुराणप्रसिद्ध कथा आहे.) १९. नौका. २०. दुग्ध. २१. कृपाव्याप्त आहे चित्त जीचें अशी.